⚡ ब्रेकिंग News

पैशांच्या व्यवहारावरून वाद! शिवीगाळ अन् दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकासह 5 जणांवर गुन्हा दाखल


  तक्रारदाराचा शर्ट फाडून गालावर चापट मारल्याचा आरोप; नगरसेवक अरशद चौधरी यांनी फेटाळले आरोप; 'उगाच नाव गोवण्यात आलं'; व्हिडिओ समोर; पेल्हार पोलिसांचा तपास सुरू

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

नालासोपारा - पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला शिवीगाळ, दमदाटी करून शर्ट फाडत चापट मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वसई-विरार महापालिकेतील (Vasai-Virar Municipal Corporation) बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अरशद जैनुल्ला चौधरी यांच्यासह पूजा राजकुमार सरोज (२५) आणि तिच्यासोबत असलेल्या तीन तरुणींविरोधात पेल्हार पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार फैजान मुन्ना शेख यांच्या म्हणण्यानुसार, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोपारा फाटा येथील मोहसीन अब्बासी वकिल यांच्या कार्यालयात ते उपस्थित होते.

त्यावेळी पूजा सरोज व तिच्यासोबत तीन तरुणी तेथे आल्या. त्यानंतर पैशांच्या व्यवहारावरून वाद झाल्याने पूजाने शिवीगाळ व दमदाटी करत शेख यांचा शर्ट फाडून गालावर चापट मारल्याचा आरोप आहे. सोबतच मोबाईल हिसकावण्याचाही प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मोहसीन यांनी डायल ११२ वर पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांना त्यांना बोलावून घेतले.

अरशद चौधरी यांनी त्या मुलींना, आपणांस मारहाण करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदारांने केला आहे.

तर तक्रारदाराचे हे आरोप नगरसेवक अरशद चौधरी यांनी फेटाळून लावले आहेत.

"आपला या घटनेशी काहीही संबंध नसून, उगाच नाव गोवण्यात आलं," असे त्यांनी सांगितले आहे.

या प्रकरणातील व्हिडिओही समोर आला असून, पेल्हार पोलिसांकडून या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.

रायगडच्या माणगाव तालुक्यात गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

वावे दिवाळी परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे माणगाव पोलिसांनी सापळा रचून लक्ष्मण झिमाजी कोकरे याला ताब्यात घेतले. कोकरे हा मोटारसायकलवरून गावठी हातभट्टीची दारू घेऊन जात असताना पोलिसांच्या हाती लागला.

त्याच्याकडून सुमारे ५२ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण १ लाख ४२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, माणगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

| मुद्दा | तपशील |

| स्थळ | सोपारा फाटा, नालासोपारा |

| तारीख | २१ सप्टेंबर, सायंकाळी ६.३० |

| आरोपी | नगरसेवक अरशद चौधरी, पूजा सरोज, ३ तरुणी |

| आरोप | शिवीगाळ, दमदाटी, शर्ट फाडून चापट |

| तक्रारदार | फैजान मुन्ना शेख |

| नगरसेवकांचे म्हणणे | 'आरोप फेटाळले, उगाच नाव गोवले' |

| तपास | पेल्हार पोलीस |

| दुसरी घटना | माणगाव – ५२ लिटर गावठी दारू जप्त |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...