लोकप्रिय नेतृत्व तानाजीराव पाटील यांचा आज वाढदिवस; कार्यकर्त्यांकडून उत्साहात साजरा
आटपाडी:
प्रत्येक कार्यकर्त्याला समान वागणूक आणि संधी देणारा, तसेच विकासाचे स्पष्ट व्हिजन असणारा नेता म्हणून ख्याती असलेले अध्यक्ष तानाजीराव पाटील यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त दिघंचीसह संपूर्ण आटपाडी तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तानाजीराव पाटील यांची ओळख आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार सुहास बाबर यांचे 'गुरुबंधू' आणि स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे 'मानसपुत्र' म्हणून आहे. अनिलभाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यात तानाजीरावांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.
याप्रसंगी बोलताना दिघंची ग्रामपंचायतीचे सदस्य मा. प्रणव गुरव म्हणाले की, "तानाजीराव पाटील हे केवळ नेते नसून कार्यकर्त्यांसाठी आधारस्तंभ आहेत. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती आणि विकासाची दूरदृष्टी यामुळेच आज जनमाणसात त्यांना मोठे स्थान आहे."
वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.