विखे पाटलांवर निलेश लंकेंचा गंभीर आरोप; जावई-मुलीचा ZR 2 कंपनीशी संबंध, 100 कोटी आणि दुबई कनेक्शनबाबत केला मोठा दावा
श्रीरामपूरच्या 4 हजार एकर जमिनीचा घोटाळा; CBI-ED चौकशीची मागणी
अहिल्यानगर : श्रीरामपूर तालुक्यातील 4 हजार एकर शेती महामंडळाची जमीन आणि ZR 2 बायो एनर्जी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. खासदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत विखे पाटील यांचे जावई आणि मुलीचा या कंपनीशी थेट संबंध असल्याचा दावा करत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे.
निलेश लंके यांनी केलेले मुख्य आरोप:
जमीन हस्तांतरण: श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 4 हजार एकर शेती महामंडळाची जमीन ZR 2 कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू होती. ही जमीन खाजगी कंपनीला देण्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय लंके यांनी व्यक्त केला. या प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
100 कोटींचा हवाला व्यवहार: ZR 2 कंपनीच्या खात्यात अवघ्या एका महिन्यात 100 कोटी रुपये जमा झाल्याचा दावा लंके यांनी केला. हा पैसा हवाला मार्गाने आला असून त्यात दुबई कनेक्शन असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. याप्रकरणी ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
कंपनीचे राजकीय संबंध:
ZR 2 ही कंपनी दुबईत नोंदणीकृत असून तिचे कार्यालय मुबंईत आहे. या कंपनीच्या संचालकांमध्ये जिमी वॉल्सन आणि निलेश जैन यांचा समावेश आहे.
प्रवरा बायो एनर्जी कंपनीच्या संचालकांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची कन्या सुप्रिया विखे पाटील यांचा समावेश आहे. तसेच निलेश जैन आणि जिमी वॉल्सन हे देखील या कंपनीचे संचालक आहेत.
विखे पाटील यांचे जावई अजित नामदेवराव ढोकणे हे देखील या कंपनीशी संबंधित असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.
सुनील कलापुरे हे ZR 2 बायो एनर्जीचे संचालक असून ते विठ्ठलराव विखे पाटील संस्थेचे अध्यक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली.
फेक कंपनीचा आरोप: "ज्या कंपनीने 4 हजार एकर जमिनीची मागणी केली आहे, ती फेक कंपनी आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित ही कंपनी आहे," असा थेट आरोप लंके यांनी केला.
निलेश लंके पुढे म्हणाले की, "शीतल पुरव या कंपनीच्या सचिव होत्या, त्यांनी अनियमतेमुळे राजीनामा दिला. ही सर्व प्रकरणे चौकशीतून बाहेर येतील. तीन मंत्र्यांची समिती स्थापन झाली आहे. आम्ही या प्रकरणी सीबीआय आणि ईडीकडे तक्रार करणार आहोत."
या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विखे पाटील गटाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.