युतीनंतरचा पहिला गुढीपाडवा; शिवतीर्थावरून राज ठाकरे आज देणार 'संघर्षाचा मंत्र'
मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज; ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणानंतर पहिलीच जाहीर सभा, राज ठाकरे यांच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष.
मुंबईतील शिवाजी पार्कवर आज (गुरुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) पारंपरिक गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. यंदाचा मेळावा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे, कारण ठाकरे बंधूंच्या नुकत्याच झालेल्या राजकीय युतीनंतरचा हा पहिलाच मेळावा आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत असून, मेळाव्याच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. संध्याकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर विशेषतः दोन मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या असून, त्यावर कोणाचा व्हिडिओ दाखवला जाणार, याबाबतही उत्सुकता आहे.
नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून या मेळाव्यात राज ठाकरे पक्षाची आगामी भूमिका, युतीनंतरचे राजकीय समीकरण आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. 'शिवतीर्था'वरून ते नेमके काय बोलणार, यावर आगामी काळातील राजकारण अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.