⚡ ब्रेकिंग News

ऑपरेशन टायगर'ची चिन्हे; उद्धव ठाकरेंच्या खासदारांशी शिंदे गटाची चर्चा फायनल?

ऑपरेशन टायगर'ची चिन्हे; उद्धव ठाकरेंच्या खासदारांशी शिंदे गटाची चर्चा फायनल?

मोदी भेटीनंतर दिल्लीत उदय सामंत-राहुल शेवाळे सक्रिय; उद्धव गटातील खासदार संपर्कात असल्याचा दावा

नवी दिल्ली/मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चिन्हे दिसू लागली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत झालेल्या भेटीनंतर 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेला उधाण आले असून, उद्धव ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या खासदारांशी शिंदे गटाच्या नेत्यांनी अगोदरच संपर्क साधला असून, 'डी-डे' (D-day) पूर्वी ही चर्चा बाहेर येऊ नये, यासाठी सावधगिरी बाळगली जात आहे. मात्र, योग्य वेळ आल्यास हे खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत केवळ विकासकामांचाच आढावा घेतला नाही, तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणनीतीवरही चर्चा केल्याचे समजते. या भेटीनंतर मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार राहुल शेवाळे हेही दिल्लीत दाखल झाले असून, पक्ष संघटनेतील बदल आणि संघटनात्मक बांधणीसाठी ते आल्याचे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, 'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "एकनाथ शिंदे हे शिवसेना खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेले होते. ऑपरेशन टायगर माझ्या ऐकीवात नाही. एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व पाहून नेते आपोआप आमच्यासोबत येतात. ठाकरे शिवसेनेचे खासदार आमच्या संपर्कात नसले तरी काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात आहेत," असे ते म्हणाले.

या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले असून, उद्धव ठाकरे गट आपले खासदार रोखण्यासाठी कोणती रणनीती आखतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...