⚡ ब्रेकिंग News

भाऊ कदमच्या लेकीचं लग्न झालं? पोस्ट तुफान व्हायरल; मृण्मयी म्हणाली, ‘माझं लग्न अन् मलाच बोलवलं नाही…’

भाऊ कदमच्या लेकीचं लग्न झालं? पोस्ट तुफान व्हायरल; मृण्मयी म्हणाली, ‘माझं लग्न अन् मलाच बोलवलं नाही…’

व्हायरल अफवांवर भाऊ कदमच्या लेकीचं सडेतोड उत्तर; अमेरिकेतून शेअर केला व्हिडिओ, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

मुंबई: मराठी सिनेसृष्टीत अलिकडे लग्नसोहळ्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. अभिनेत्री अपूर्वा गोरे, रुमानी खरे यांनी आपल्या पार्टनरसह साताजन्माची गाठ बांधली. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन भाऊ कदम यांच्या लेकीच्या लग्नाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या अफवांवर भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम हिनेच सडेतोड उत्तर दिले आहे.

व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?

सध्या सोशल मीडियावर ‘मृण्मयी कदमच्या लग्नात वडील भाऊ कदम भावुक झाले. संघर्षाच्या दिवसांची आठवण काढत कुटुंबासह उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले,’ अशा आशयाची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टनंतर मृण्मयी कदम हिचं खरंच लग्न झालं आहे का, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित होत आहे.

मृण्मयीचं व्हिडीओतून स्पष्टीकरण

या अफवांवर मृण्मयी कदम हिने स्वतः स्पष्टीकरण देत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमेरिकेतून शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “माझ्या लग्नात तुम्ही मलाच आमंत्रण दिलं नाही. हे काही योग्य नाही. मला तरी कळायला हवं ना, की मी मॅरेड आहे, माझं लग्न झालं आहे. ते देखील मी अमेरिकेत असताना… मला हे सगळं आता कळालं आहे. प्लीज, कृपया माझ्या लग्नात मला बोलवा.”

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

मृण्मयीचा हा विनोदी अंदाज चाहत्यांना भावला आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्या अभिव्यक्तीचं कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने विनोदी शैलीत कमेंट करत म्हटले, “वेडिंग खूप प्रायव्हेट होतं वाटतं, म्हणून नवरी मुलीलाही बोलवलं नाही वाटतं.”

मृण्मयीच्या या व्हिडीओमुळे लग्नाच्या अफवांवर पूर्णविराम बसला असून, तिच्या उत्तराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...