⚡ ब्रेकिंग News

राज्यसभेवर बिनविरोध निवडीनंतर आभार मानण्यासाठी विशेष आयोजन; २३ मार्चला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम.


राज्यसभेवर बिनविरोध निवडीनंतर आभार मानण्यासाठी विशेष आयोजन; २३ मार्चला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये  कार्यक्रम.

 शरद पवारांकडून मविआच्या आमदारांसोबत 'डिनर डिप्लोमसी'चं आयोजन; नेमकं कारण काय?

मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ७ जागांवरील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यंदा राज्यसभेवर पवार घराण्यातून आजोबा आणि नातू अशा दोघांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. अशातच या निवडीनंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून मविआचे नेते आणि आमदारांसोबत विशेष 'डिनर डिप्लोमसी'चे आयोजन करण्यात आले आहे.

आभार प्रकट करण्यासाठी विशेष कार्यक्रम

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची महाविकास आघाडीकडून राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याच्या निमित्ताने आभार प्रकट करण्यासाठी या डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी म्हणजेच २३ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. या डिनर डिप्लोमसीमध्ये आता काही राजकीय चर्चा होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया काय?

राज्यसभेच्या एका जागेवर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. बिनविरोध निवड झाल्यानंतर शरद पवार यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे."

१९६७ पासूनचा अखंड प्रवास

शरद पवार पुढे म्हणाले, "१९६७ पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले."

"१९६७ मध्ये प्रथम महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्याने काम करत असताना लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. तसेच केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मला मिळाली. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ राहिले आहे," असेही शरद पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

राजकीय हालचालींकडे लक्ष

शरद पवार यांच्या या डिनर डिप्लोमसीचे आयोजन महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमधील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. या कार्यक्रमात मविआतील आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत कोणती चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...