⚡ ब्रेकिंग News

८६ व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास; 'लोन वुल्फ मॅकक्वेड', 'कोड ऑफ साइलेंस' सारख्या चित्रपटांनी केले कलाकार अमर.


  ८६ व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास; 'लोन वुल्फ मॅकक्वेड', 'कोड ऑफ साइलेंस' सारख्या चित्रपटांनी केले कलाकार अमर.

प्रसिद्ध अभिनेता, ॲक्शन हिरो चक नॉरिस यांचं निधन, कुटुंबाकडून भावनिक पोस्ट शेअर; सिनेसृष्टीत शोककळा

लॉस एंजेलस : हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. दिग्गज अभिनेते, मार्शल आर्टिस्ट आणि ॲक्शन हिरो म्हणून ओळखले जाणारे चक नॉरिस यांचं निधन झाले आहे. ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली असून, जगभरातील चाहत्यांमध्ये दुःखाची भावना आहे.

कुटुंबाची भावनिक पोस्ट व्हायरल

चक नॉरिस यांच्या कुटुंबाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्याचा फोटो शेअर केला असून, त्याला हृदयस्पर्शी कॅप्शन दिले आहे. कुटुंबाने लिहिले, "अत्यंत दुःखाने, आमच्या लाडक्या चक नॉरिस यांच्या आकस्मिक निधनाची बातमी देत आहोत. आम्ही ही बातमी खासगी ठेवणार होतो. शेवटच्या क्षणी ते कुटुंबासोबत होते. शांतीने आमच्या आयुष्यातून निघून गेले."

पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, "जगासाठी ते एक महान मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेते होते. पण आमच्यासाठी ते एक चांगले पती, मुलांवर प्रेम करणारे वडील, भाऊ आणि आमच्या कुटुंबाचे हृदय होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य श्रद्धा, ध्येय आणि आपल्या प्रियजनांप्रती पूर्ण निष्ठेने जगले."

चाहत्यांसाठी कुटुंबाचा विशेष संदेश

चक नॉरिस यांच्या कुटुंबाने चाहत्यांसाठीही एक विशेष संदेश दिला आहे. त्यांनी लिहिले, "चक नॉरिस यांनी आपल्या कारकिर्दीत, कामातून, शिस्तीतून आणि दयाळूपणातून जगातील लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या निधनानंतर आम्ही तुटलो आहोत. पण त्यांनी आमच्यासोबत घालवलेल्या क्षणांबद्दल आभारी आहोत. जगभरातील त्यांच्या चाहत्यांकडून मिळालेले प्रेम आणि पाठिंबा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. कुटुंबाच्या वतीने आम्ही चाहत्यांचे मनापासून आभार मानतो."

कुटुंबाने असेही आवाहन केले की, "कृपया या दुःखद काळात आमच्या कुटुंबाला एकांत द्या. तुमच्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद."

प्रकृती अचानक बिघडली

टीएमजेडच्या वृत्तानुसार, या महिन्यात चक नॉरिस यांनी ८६ व्या वर्षी पदार्पण केले होते. १९ मार्च रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अभिनेत्याची कारकीर्द

चक नॉरिस यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. 'लोन वुल्फ मॅकक्वेड', कोड ऑफ साइलेंस' आणि 'वेह ऑफ द ड्रॅगन' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचं प्रचंड कौतुक झाले. मार्शल आर्टमधील त्यांच्या कौशल्यामुळे त्यांनी ॲक्शन सिनेमांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. 'टेक्सास रेंजर्स' या लोकप्रिय मालिकेतूनही ते घराघरात पोहोचले. अभिनयासोबतच ते एक उत्तम मार्शल आर्टिस्ट म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने हॉलिवूडमध्ये शोकाचे वातावरण आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...