⚡ ब्रेकिंग News

मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; त्र्यंबकेश्वरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, ४ जागीच ठार तर ६ जण जखमी


 शहापूर तालुक्यातील अटगाव जवळ उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक; जोगेश्वरीतील कुटुंब देवदर्शनासाठी गेले होते; मृत्यूमध्ये दोन लहान मुलांचा समावेश; जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

शहापूर (जि. ठाणे) - मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृत्यूमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील अटगाव जवळ दोन वर्षांपूर्वी जळालेल्या उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला, अशी माहिती आहे.

दरम्यान, हे सर्व जोगेश्वरी येथील रहाणारे होते. देव दर्शनासाठी कुटुंबासह त्र्यंबकेश्वरला गेले होते. दरम्यान परतीच्या प्रवासात अटगाव जवळ हा भीषण अपघात झाला, अशी माहिती आहे.

या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. तर ६ जण जखमी झाले असून यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी जळालेला एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. भाविकांचे वाहन भरधाव वेगात येत असताना उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली.

दरम्यान, ऋषिपंचमीनिमित्त काल मध्यप्रदेशमधील सौंसर इथं गेलेल्या भाविक महिलांच्या वाहनाला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, वाहनातील चार महिला गंभीर जखमी तर, उर्वरित महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.

ही घटना मध्यप्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यातील सौंसर तालुका अंतर्गत येणाऱ्या तीनखेडा या गावात घडली.

आदित्य मांढरे (वय २४) असे मृत वाहन चालकाचे नाव आहे. तर, जखमींमध्ये मंगला ठवकर, रेणा चौधरी, जयश्री झंजाळ, शीला तीतिरमारे यांचा समावेश आहे. जखमींवर सौंसर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे माहिती मिळत आहे.

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वसई तालुक्यातील खानिवडे टोलनाक्यापासून सकवारपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक वाढलेली असतानाही विरार वाहतूक शाखेच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोंडीत आणखी भर पडल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने नियोजन आणि उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

| घटना | तपशील |

| मुंबई-नाशिक महामार्ग अपघात | ४ ठार, ६ जखमी; अटगाव जवळ उभ्या ट्रकला धडक |

| मृतांमध्ये | दोन लहान मुलांचा समावेश |

| प्रवास | त्र्यंबकेश्वरहून देवदर्शन करून परतत होते |

| मध्यप्रदेश अपघात | वाहन चालक ठार, ४ महिला गंभीर जखमी |

| ठिकाण | तीनखेडा, सौंसर तालुका, पांढुर्णा जिल्हा |

| वाहतूक कोंडी | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खानिवडे ते सकवार |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...