क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - महायुती सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 78,700 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
CNBC TV18 ने आरटीआयद्वारे मिळवलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 ते जुलै 2026 या कालावधीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 78,700 कोटी रुपये खर्च केले आहेत.
डिसेंबर 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. जुलै 2026 पर्यंत या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 64 लाखांवर आली आहे.
राज्य सरकारनं ऑगस्ट 2025 पासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यानं लाभार्थ्यांच्या यादीतून नावं कमी झालेल्या महिलांची संख्या 62 लाख इतकी आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. 2 कोटी 46 लाखांवरून लाभार्थी संख्या 1 कोटी 64 लाखांवर आली आहे. म्हणजेच ई-केवायसी न केल्यानं आणि इतर कारणांमुळं अपात्र ठरल्यानं लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.
याशिवाय, उत्पन्न मर्यादा, चारचाकी वाहन असणे, सरकारी कर्मचारी असणे, इतर योजनांचा लाभ घेणे अशा अनेक कारणांमुळेही लाखो महिला या योजनेतून वगळल्या गेल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी शासनाने 'लाडकी बहीण योजने'बाबतची कोणतीही लपवाछपवी न करता खरी आणि निर्दोष आकडेवारी जारी करावी, अशी मागणी केली आहे.
"या योजनेबाबतची श्वेतपत्रिका तातडीने प्रसिद्ध करावी आणि 5,000 कोटींच्या अपात्र वितरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी," अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
सुप्रिया सुळेंनी 5,000 कोटी रुपयांच्या अपात्र वितरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. याचा अर्थ असा की, अपात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असावा, असा त्यांचा आरोप आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या लाभाचं वितरण सरकारकडून कधी केलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लाडकी बहीण योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात.
| मुद्दा | तपशील |
| योजना | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
| सुरुवात | जुलै 2024 |
| आतापर्यंतचा खर्च | 78,700 कोटी रुपये (जुलै 2024 – जुलै 2026) |
| डिसेंबर 2024 मधील लाभार्थी | 2 कोटी 46 लाख |
| जुलै 2026 मधील लाभार्थी | 1 कोटी 64 लाख |
| वगळलेल्या महिला | 62 लाख (ई-केवायसी न केल्याने) |
| मासिक लाभ | 1,500 रुपये |
| सुप्रिया सुळेंची मागणी | श्वेतपत्रिका आणि 5,000 कोटींच्या अपात्र वितरणाची चौकशी |
| ऑगस्ट हप्ता | प्रतीक्षेत |

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.