क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
मुंबई - 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) सिनेमाची अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini) आपल्या पहिल्याच सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीची सुपरस्टार अभिनेत्री ठरल्या. पण, कधीकाळी त्यांच्या एका फोटोमुळे खळबळ माजलेली होती. अख्खी सिनेसृष्टी हादरवणारा तो फोटो आजही तितकाच चर्चेत असतो. आज कित्येक वर्षांनी त्याच फोटोबाबत अभिनेत्री मंदाकिनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही ज्या खळबळ माजवणाऱ्या फोटोबाबत बोलतोय, तो फोटो होता, अभिनेत्री मंदाकिनी आणि कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) यांचा. मंदाकिनी आणि दाऊद यांना एकत्र पाहून भारतातील प्रत्येकाच्याच पायाखालची जमीन हादरली होती.
नव्वदच्या दशकात मंदाकिनी यांचा एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये त्या दाऊदसोबत दिसल्या होत्या. हा फोटो दुबईच्या शारजाह स्टेडियममधला होता. तिथे दाऊद आणि त्याच्यासोबत स्टार अभिनेत्री मंदाकिनी क्रिकेट सामना पाहताना दिसत होत्या. या फोटोवरून खूप खळबळ माजलेली होती.
अभिनेत्री मंदाकिनीने ANI शी बोलताना स्पष्ट केले की, त्यांचे दाऊदसोबत कोणतेही कनेक्शन नाही आणि ना त्यांना दाऊदने बोलावलेले होते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, "कुणाला काहीही लिहायचंय, कुणाला काहीही बोलायचंय, आपण त्यांना थांबवू शकत नाही. एका कलाकाराला हजारो लोक भेटत असतात आणि त्या कलाकारालाही सर्वांसोबत सारखं वागावं लागतं. खूप लोक एकत्र होते, आपण कुणाला निवडायचं आणि कुणाला नाही?"
"आम्ही तिथे दुबईला एका शोसाठी गेलेलो. मला दाऊदनं बोलावलं नव्हतं." असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मंदाकिनीने सांगितले की, तो एक फोटो व्हायरल झाल्यानंतर वाद एवढा वाढला की, त्यामुळे त्यांच्या करिअरवर त्याचा विचित्र प्रभाव पडला.
त्यांनी म्हटले की, "या वादामुळे खूप नुकसान झालेलं. त्यानंतर मला कळालं की, या सर्व गोष्टी सांभाळण्यासाठी एक टीम असायला हवी. मी प्रत्येक ठिकाणी या अफवा फेटाळून लावल्या होत्या..."
राज कपूर यांच्या दिग्दर्शनात बनलेली फिल्म 'राम तेरी गंगा मैली' (१९८५) च्या यशानंतर मंदाकिनी रातोंरात स्टार बनल्या. या सिनेमातील त्यांची भूमिका आणि अभिनय यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
दरम्यान, त्यानंतर आलेले त्यांचे 'डांस डांस', कहां है कानून' आणि 'प्यार करके देखो' यांसारखे सिनेमे मात्र फारसे चालले नाहीत.
त्यानंतर अभिनेत्रीने १९९६ मध्ये त्यांचा शेवटचा सिनेमा 'जोरदार' केला आणि बॉलिवूडला अलविदा म्हटले.
| मुद्दा | तपशील |
| अभिनेत्री | मंदाकिनी |
| प्रसिद्ध सिनेमा | राम तेरी गंगा मैली (१९८५) |
| वादग्रस्त फोटो | दाऊद इब्राहिमसोबत, शारजाह स्टेडियम, दुबई |
| स्पष्टीकरण | 'दाऊदसोबत कोणतंही कनेक्शन नाही, ना त्यानं बोलावलं' |
| कारण | दुबईतील शोसाठी गेले होते |
| परिणाम | करिअरवर विपरीत परिणाम |
| शेवटचा सिनेमा | जोरदार (१९९६) |

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.