⚡ ब्रेकिंग News

​सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; विठ्ठरायचीवाडीचा तरुण पिस्टलसह जेरबंद



​क्रांती न्यूज सांगली (प्रतिनिधी) किरण देशमुख :
सांगली : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नागठाणे परिसरात सापळा रचून एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
​नेमकी घटना काय?
​सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे आणि गंभीर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक विशेष पथक तैनात केले होते.
​हे पथक भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. विठ्ठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) हा नागठाणे फाटा ते वाळवा जाणाऱ्या रोडवरील चोपण रस्ता येथे कमरेला पिस्टल लावून थांबला आहे.
​पोलिसांचा धाडसी सापळा
​मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिकेत करांडे याला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे:
​०१ देशी बनावटीचे पिस्टल
​०१ जिवंत काडतूस (राऊंड)
मिळून आले. या शस्त्राबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता.
​तपासात धक्कादायक खुलासा
​अटक करण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याने हे पिस्टल आपल्या सुरक्षिततेसाठी अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत) याच्याकडून विकत घेतले होते. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास आता जत कनेक्शनच्या दिशेने सुरू आहे.
​न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
​याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने त्याला ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोळी करत आहेत.
​"जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे."
— स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...