बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धकाची EXIT; नाव ऐकून प्रेक्षकांना बसला धक्का, कुणाचा पत्ता कट?
सात सदस्य नॉमिनेट, प्रेक्षकांच्या चर्चेत एकाच नावाने वातावरण; रविवारच्या भागात होणार उघड, अवघ्या काही दिवसांत संपुष्टात आला प्रवास
मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनने प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. घरातील सदस्य उत्तम खेळ खेळत असून, अनेक तगड्या स्पर्धकांची एक्झिट झाली आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतनंतर तीन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. मागच्या आठवड्यात सिंगर प्राजक्ता शुक्रे ही बिग बॉसच्या घरातून बेघर झाली होती. दरम्यान, या आठवड्यात कोणाची एक्झिट होणार, याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत.
तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची झाली होती एन्ट्री
काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात तीन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. संकेत पाठक, रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंके यांची एन्ट्री होताच घरातील समीकरणं बदलली होती. या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले असल्याची माहिती आहे. ज्यात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या स्पर्धकांचाही समावेश आहे.
या सदस्यांची नॉमिनेशन लिस्ट
रेवा कौरासे, दीपाली सय्यद, विशाल कोटियन, सागर कारंडे, प्रभू शेळके, संस्कृती साळुंके यांना या आठवड्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. होस्ट रितेश देशमुख या सात सदस्यांच्या नावांची घोषणा करून कोण घरातून बेघर होणार, याची माहिती देणार आहेत.
कोणाचा पत्ता कटणार?
एलिमिनेशनपूर्वीच सात नावांपैकी एका नावाची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉस मराठीशी संबंधित काही पेज, सोशल मीडिया अकाऊंट आणि रेडिटवरील चर्चांनुसार, बिग बॉसच्या घरातून संस्कृती साळुंके बेघर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया?
या घरातून जी व्यक्ती बेघर होणार आहे, ती व्यक्ती कोण याचा प्रेक्षकांना दुःख न होता आनंद झाल्याचे दिसून येत आहे. कारण अगदी बिग बॉस घरातील पहिल्या दिवसापासून त्या व्यक्तीचा खेळ दिसला नसल्याचे प्रेक्षकांनी मत व्यक्त केले आहे. संस्कृती साळुंके यांनी वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती, मात्र अवघ्या काही दिवसांतच त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपुष्टात येत असल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे. याची अधिकृत माहिती रविवारच्या भागात उघड होईल.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.