⚡ ब्रेकिंग News

रात्री जेवण झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी वॉटर कुलरजवळ गेला अन् नळाला चिटकला; पुणे कृषी महाविद्यालयात धक्कादायक घटना


रात्री जेवण झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी वॉटर कुलरजवळ गेला अन् नळाला चिटकला; पुणे कृषी महाविद्यालयात धक्कादायक घटना

वीज शॉकने कोमात जाऊन २३ वर्षीय एमबीए विद्यार्थ्याचा मृत्यू; अनवाणी पायांमुळे शॉकचा धक्का अधिक तीव्रतेने बसल्याची शक्यता

पुणे: पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या (कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर) मेसमध्ये पाणी पिताना लागलेल्या भीषण विद्युत शॉकमुळे एका २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या या तरुणाने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासकीय सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नेमकी घटना काय?

चैतन्य पुंडलिक चव्हाण (२३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रहिवासी असून पुण्यातील कृषी महाविद्यालयात 'एमबीए' (अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट) च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. चैतन्यचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत.

१४ मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर चैतन्य पाणी पिण्यासाठी वॉटर कुलरजवळ गेला होता. त्याचा मित्र अक्षय सूर्यवंशी याने दिलेल्या माहितीनुसार, वॉटर कुलर नीट थंड होत नसल्याने चैतन्यने त्याची पिन पुन्हा सॉकेटमध्ये लावली. मात्र, नळाला स्पर्श करताच त्याला जोरदार शॉक लागला आणि तो तिथेच चिटकला. मागून मदतीला धावलेल्या मित्रालाही काही करता आले नाही. अखेर वीजपुरवठा खंडित केल्यानंतर तो खाली कोसळला आणि त्याची शुद्ध हरपली.

अनवाणी पायांमुळे शॉकचा धक्का अधिक तीव्र?

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसमध्ये चपला घालून जाण्यास सक्त मनाई आहे. अनवाणी पायाने पाणी पिण्यास गेलेल्या चैतन्यला चपला नसल्यामुळे शॉकचा फटका अधिक तीव्रतेने बसला, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेनंतर त्याला उपचारासाठी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चैतन्यला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शॉकमुळे त्याच्या मेंदूला गंभीर इजा (हायपॉक्सिक ब्रेन इन्सल्ट) झाल्याने त्याची प्राणज्योत मालवली.

प्रशासनाची भूमिका आणि चौकशी

या घटनेनंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (राहुरी) कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील यांनी सर्व कृषी महाविद्यालयांचे सुरक्षा ऑडिट (विद्युत, अग्नी आणि स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी 'अकस्मात मृत्यू'ची नोंद केली असून, या प्रकरणी कोणाची जबाबदारी आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...