⚡ ब्रेकिंग News

रुपाली चाकणकरांच्या बचावासाठी सुनील तटकरेंच्या भेटीगाठी, विखेंना घेऊन फडणवीसांच्या बंगल्यावर, नेमकी चर्चा काय?


 रुपाली चाकणकरांच्या बचावासाठी सुनील तटकरेंच्या भेटीगाठी, विखेंना घेऊन फडणवीसांच्या बंगल्यावर, नेमकी चर्चा काय?

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर कारवाईची वाढती मागणी; राष्ट्रवादीत दोन गटात सुप्त संघर्ष सुरू, रुपाली ठोंबरे पाटील आज सुनेत्रा पवारांची भेट घेणार

मुंबई: विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी लागेबांधे असल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झालेल्या रुपाली चाकणकर यांचा पाय दिवसेंदिवस खोलात चालला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांना हटवले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

रुपाली चाकणकरांच्या बचावासाठी तटकरे-विखे सक्रिय

रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पक्षातील एका गटाकडून जोरदारपणे केली जात असतानाच, दुसऱ्या बाजूला खासदार सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकरांच्या बचावासाठी पाठराखण सुरू केल्याचे समोर आले आहे. सुनील तटकरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीत रुपाली चाकणकर यांच्या प्रकरणी काय चर्चा झाली, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कालच सुनेत्रा पवार यांनी अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हापासून रुपाली चाकणकर यांचे महिला प्रदेशाध्यक्षपद जाईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आता सुनील तटकरे यांनी विखेंना घेऊन फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीत दोन गटात सुप्त संघर्ष

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे. रुपाली चाकणकर यांच्यावरील कारवाईच्या निमित्ताने या दोन गटांमध्ये सुप्त संघर्ष रंगल्याचे बोलले जात आहे. रुपाली चाकणकर यांना पक्षातील सर्व पदांवरून हटवावे की नाही, याबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीविरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांची फक्त महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनच नव्हे तर पक्षातूनच हकालपट्टी करावी, अशी मागणी नाशिकमधील तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि ओबीसी विभागाच्या अध्यक्षांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एखाद्या वरिष्ठ नेत्याचा वरदहस्त असल्याशिवाय हे लहान पदाधिकारी थेट रुपाली चाकणकर यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करणार नाहीत, अशी चर्चा आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांची सुनेत्रा पवारांची भेट

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेणार आहेत. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या प्रकरणात राज्यातील महिला कार्यकर्त्यांची नाराजी आणि रोष असून या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासमोर त्या आपली भूमिका मांडणार आहेत.

रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची बदनामी झाली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी थेट रुपाली पाटील ठोंबरे या सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत महिला सुरक्षित नाही, त्यामुळे नाशिकच्या अनेक महिलांनी राजीनामा देखील दिल्याचे समोर आले आहे. पक्षात महिलांची गरज आहे आणि त्या सुरक्षित असल्या पाहिजेत. अशातच आपले म्हणणे मांडण्यासाठी रुपाली पाटील ठोंबरे या सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

आता सुनेत्रा पवार यांच्याकडून रुपाली चाकणकर यांच्याबाबत कठोर निर्णय घेतला जाणार की नाही, आणि सुनील तटकरे यांच्या भेटीचा त्यावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...