‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांच्या भेटीस नवे स्वामी, अक्षय मुदवाडकरची जागा कोण घेणार?
पाच वर्षांनंतर मालिकेत होणार बदल; सुनील गोडसे साकारणार श्री स्वामी समर्थांची भूमिका, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया संमिश्र
मुंबई: मराठी मालिकांच्या विश्वात ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात श्रद्धेचे स्थान निर्माण केले आहे. सकारात्मक संदेश देणारी ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांची आवर्जून पाहिली जाते. मात्र, आता या मालिकेत मोठा बदल होत असून प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
अक्षय मुदवाडकर यांची भूमिका होणार बदल?
गेल्या पाच वर्षांपासून श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अभिनेता अक्षय मुदवाडकर आता प्रेक्षकांना या भूमिकेत दिसणार नाहीत. त्यांनी साकारलेली शांत आणि संयमी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे ही मालिका अगदी खरी आणि जिवंत वाटत होती. मात्र, आता त्यांच्या जागी दुसरा अभिनेता श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहे.
कोण साकारणार मुख्य भूमिका?
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय मुदवाडकर यांच्या जागी प्रसिद्ध मराठी अभिनेते सुनील गोडसे श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत. श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी मालिकेत त्यांची एन्ट्री झाली असून, त्यांच्या एन्ट्रीचा पहिला एपिसोडही प्रसारित झाला आहे. श्री स्वामी महाराज हे पात्र सुनील गोडसे कसे सादर करतात, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय?
मालिकेत झालेल्या या बदलानंतर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अक्षय मुदवाडकर यांनीच श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारायला हवी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर, काही प्रेक्षकांनी सुनील गोडसे यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. सुनील गोडसे या पात्राला कितपत न्याय देतात, हे पुढील भागांमध्ये स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.