‘मी संन्याशी आहे, लग्न करू शकत नाही, पैसे घेऊन मिटवून…’; जवळपास वर्षभराच्या संबंधानंतर नांदेडच्या महाराजाचा युटर्न; महिला शिष्यासोबत नको ते केलं
लग्नाचे आमिष दाखवून ४६ वर्षीय महिलेवर अत्याचार; मठातील प्रमुख संत हरीगीर दत्तगीर गिरी याला पोलिसांनी केली अटक; नाशिकनंतर नांदेडमध्येदेखील संतापजनक घटना
नांदेड: नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजत असताना नांदेडमध्ये देखील एका मठातील महाराजाचा संतापजनक कारनामा समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महाराजाने ४६ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी महाराजाला अटक करत गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे आरोपी?
संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नांदेड शहरातील गाडीपुरा भागात महंत बाळगीर महाराज मठ असून, संत हरीगीर दत्तगीर गिरी हे या मठाचे प्रमुख आहेत. दर पौर्णिमा आणि अमावस्येला भाविक दर्शनासाठी या मठात मोठ्या संख्येने गर्दी करत असतात.
कशी घडली घटना?
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडित महिला १२ मे २०२५ रोजी मठात दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी महाराज आणि पीडित महिलेची ओळख झाली. महाराजाने महिलेचा मोबाईल नंबर घेतला, त्यानंतर दोघांमध्ये फोनवर संभाषण सुरू झाले. जून महिन्यात महिलेने महाराजांना गुरु केले होते.
लग्नाचे आमिष आणि अत्याचार
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, महाराजांनी ‘माझा वाढदिवस आहे. शुभेच्छा देण्यासाठी तू माझ्या घरी ये,’ असे तगादा लावला. शिवाय लग्नाचे आमिष दाखवून महाराजाने महिलेच्या घरी जाऊन शरीर सुखाची मागणी करत अत्याचार केला. जवळपास वर्षभर हे संबंध सुरू होते.
धमकी आणि गुन्हा दाखल
लग्नाबाबत महिलेने विचारणा केल्यानंतर महाराज म्हणाले, ‘मी संन्याशी आहे, लग्न करू शकत नाही. पैसे घेऊन प्रकरण मिटवून घे.’ तसेच त्यांनी महिलेला धमकीही दिली. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर पीडित महिलेने भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ६९, ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून संशयित आरोपी संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज याला अटक केली आहे. पुढील तपास भाग्यनगर पोलीस करत आहेत. नाशिकनंतर नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.