राष्ट्रीय एन्व्हायर्नमेंटल यूथ पार्लमेंटमध्ये लातूरच्या विशाल परिहार यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
लातूर : नॅशनल एन्व्हायर्नमेंटल यूथ पार्लमेंटच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर येथील विद्यार्थी विशाल परिहार यांनी केले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली होती.
ही राष्ट्रीय स्पर्धा दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडली. पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि युवकांची भूमिका या विषयांवर देशभरातील निवडक विद्यार्थ्यांनी प्रभावी मांडणी करत आपले विचार व्यक्त केले. विविध राज्यांतील स्पर्धकांमध्ये उत्स्फूर्त चर्चा व सादरीकरण झाले.
राज्यस्तरीय फेरीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. उत्कृष्ट सादरीकरण, विषयाची सखोल मांडणी, प्रभावी संवाद कौशल्य आणि नेतृत्वगुण यांच्या जोरावर विशाल परिहार यांनी परीक्षकांची मने जिंकत राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले.
विशाल परिहार यांनी पर्यावरण संरक्षणासाठी युद्धपातळीवर प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. युवकांनी पर्यावरणीय जबाबदाऱ्या स्वीकारून सक्रिय सहभाग घ्यावा व भविष्यासाठी शाश्वत पर्याय उभारावेत, असे आवाहन केले.
या स्पर्धेत उल्लेखनीय सहभागाबद्दल विशाल परिहार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.