टीम इंडियाने नामिबियावर दणदणीत विजय मिळवला. टी-२० विश्वचषक गट सामन्यात भारताने ९३ धावांनी नामिबियाला पराभूत केले.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या गट सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन आणि हार्दिक पांड्याच्या अर्धशतकांवर २० षटकांत ९ बाद २०९ धावा केल्या. नामिबिया १८.२ षटकांत ११६ धावांवर गारद झाला.
या विजयाने भारताचा सलग दुसरा यशस्वी सामना झाला. यापूर्वी अमेरिकेविरुद्ध पहिला विजय मिळवला होता.
या विजयामुळे भारताने गट 'अ' मध्ये अव्वल स्थान पटकावले. पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर घसरला. सर्वांचे लक्ष आता १५ फेब्रुवारीला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर केंद्रित आहे.
.jpeg)
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.