मुंबई – राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांच्यावर केलेल्या भाषिक टीकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या टीकेवर आता शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राऊत यांनी कोश्यारी यांच्यावर व्यक्तिगत टीका करताना त्यांच्याच शब्दात पलटवार केला. "ज्या माणसाला नीट धोतर नेसता येत नाही, तो आम्हाला अक्कल शिकवतोय," अशी खोचक टीका राऊत यांनी केली.
कोश्यारी यांनी काय म्हटले होते?
भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर हा वाद चिघळला. कोश्यारी म्हणाले होते, "राज ठाकरे हे माझ्या लहान भावासारखे आहेत. पण ते नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत. त्यांनी मोदींच्या जवळ जायला हवे. मोदींसाठी सर्वजण समान आहेत, जशी रामाची सर्व प्रजा समान होती. घाबरायचे असेल तर चुकीचे काम करायला घाबरा."
राऊत यांचा पलटवार
संजय राऊत यांनी मात्र ही टीका फेटाळून लावत कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "धोतर नीट नेसता येत नसलेला हा माणूस राज ठाकरेंना मोदींना न घाबरण्याचा उपदेश देतोय. पंतप्रधान संसदेतून का पळून गेले, याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. कालच राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान आणि अमित शाह यांच्यात डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही," असा हल्ला राऊत यांनी केला.
राऊत पुढे म्हणाले, "हा एक नंबरचा लफंगा माणूस आहे. याला पद्मभूषण पुरस्कार देऊन भारतीय जनता पक्षाने त्याचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला हा सन्मान दिल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे असते तर पुरस्कार देणाऱ्यांना जोड्याने मारले असते," अशा शब्दात राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या टीकेनंतर कोश्यारी यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा तणाव निर्माण झाला असून आगामी काळात या वादाला अधिक चांग फुटण्याची शक्यता आहे.

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.