⚡ ब्रेकिंग News

'दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर अजितदादांशी बोलणं झालं होतं'; सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याचा मोठा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. "माझं आणि दादा (अजित पवार) यांच्यात विलीनीकरणावर चर्चा झाली होती. हे बोलणं अजितदादांना माहीत होतं," असं सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

बहीण-भावातील चर्चा वास्तविक होती

सुळे म्हणाल्या, "बहीण-भावामध्ये जे बोलणं झालं ते आमच्यात आहे आणि ते वास्तव आहे. अनेकांना विलीनीकरणाबाबत बऱ्याच गोष्टी माहीत आहेत; मात्र मी बोलणं काहींना आवडत नाही. आज अनेक नेते मात्र मौन बाळगून आहेत."

सुनेत्रा पवार यांच्याबद्दल भावुक प्रतिक्रिया

सुनेत्रा पवार यांच्या पालकमंत्रिपदी झालेल्या नियुक्तीवर बोलताना सुप्रिया सुळे या भावुक झाल्या. "मी आणि सुनेत्रा वहिनी यापूर्वीही डीपीडीसीमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांच्यावर नवीन जबाबदारी आली आहे. एका डोळ्यात अश्रू, तर एका डोळ्यात आनंद आहे. सुनेत्रा वहिनी पालकमंत्री झाल्याचा अभिमान आहे; पण अजितदादा नसल्याचं दुःख मात्र कधीच भरून निघणार नाही. आजही खरं वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाहीत," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांची प्रकृती सुधारली

रुग्णालयात दाखल असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी सुप्रिया सुळेंनी माहिती दिली. "खूप चांगली आहे. रूबी हॉल रुग्णालयाच्या स्टाफचे मी आभार मानते. उद्या पवार साहेबांना डिस्चार्ज मिळू शकतो," असं त्यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल आभार मानले. "अजितदादा गेल्यानंतरही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आमची साथ दिली. त्यासाठी मी सर्वांची ऋणी आहे," असं त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुट आणि विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे.





Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...