⚡ ब्रेकिंग News

काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस. एम. जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा


 एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवारांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; आंदोलनाला मिळतोय महाविकास आघाडी व राष्ट्रीय नेत्यांचा पाठिंबा; भाजपचं 'पुणे बंद करून दाखवा'चं आव्हान; राहुल गांधींच्या भेटीची शक्यता; पोलिस बंदोबस्त वाढवल्याने आंदोलन उधळण्यात येणार का, असा प्रश्न

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

पुणे : गेल्या आठवड्याभरापासून पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचं एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, आजपर्यंत आंदोलनाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आज आंदोलनाचा सातवा दिवस असतानाच या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे रोहित पवार यांनी जर एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा नाही आल्यास पुणे बंदचा इशारा दिला होता. त्यानंतर आज सकाळपासूनच पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलन पोलिसांकडून उधळण्यात येणार का, असा सुद्धा सवाल उपस्थित केला जात आहे. आज सकाळपासूनच अचानक बंदोबस्त वाढवल्याने एस. एम. जोशी पुलावर नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे. ६ गाड्या सुद्धा तैनात करण्यात आल्या आहेत.

गेल्या ७ दिवसांपासून रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी सुद्धा भेटीगाठी दिल्या आहेत. कालच 'आप'चे खासदार संजय सिंह यांनी सुद्धा एमपीएससी आंदोलनाला भेट दिली होती. आमदार आदित्य ठाकरे सुद्धा या आंदोलनस्थळी पोहोचले होते. महाविकास आघाडीकडून तसेच विद्यार्थ्यांकडून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा वाढत जात असतानाच, आता अचानक पोलिसांचा फौजफाटा वाढल्याने नेमकं अलका चौकातून आंदोलनकर्ते हलवण्याची तयारी आहे का, असं प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीमुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः रात्रभर विद्यार्थ्यांसोबत या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

आज आंदोलनाचा सातवा दिवस असतानाच या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत आंदोलनामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे या आंदोलनावर न्यायालय काय आदेश देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहित पवार यांनी जर एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा नाही आल्यास पुणे बंदचा इशारा दिला होता. या इशारानंतर आज सकाळपासूनच पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलन पोलिसांकडून उधळण्यात येणार का, असा सुद्धा सवाल उपस्थित केला जात आहे.

रोहित पवार यांनी पुणे बंदचा इशारा दिल्यानंतर भाजपकडून सुद्धा त्यांना 'पुणे बंद करून दाखवाच' असं आव्हान करण्यात देण्यात आलं आहे. त्यामुळे या आंदोलनाचं काय होणार आता, हे आज-उद्या स्पष्ट होणार आहे.

दुसरीकडे, राहुल गांधी हे सुद्धा आंदोलनस्थळी भेट देतील असे सुतोवाच रोहित पवार यांच्याकडून करण्यात येत आहेत. मात्र, अजूनही त्यांची तारीख निश्चित झालेली नाही, त्यामुळे आज-उद्या किंवा दोन दिवसांमध्ये राहुल गांधी आंदोलनाला भेट देऊ शकतात, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

या आंदोलनाला महाविकास आघाडीचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय सिंह यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे. तसेच, इतर अनेक नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

विद्यार्थ्यांनी या आंदोलनात अनेक मागण्या मांडल्या आहेत. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, ही प्रमुख मागणी आहे. तसेच, स्पर्धा परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच पार पडाव्यात, इतर परीक्षांमध्येही पेपरफुटी झाली आहे का याची सखोल चौकशी व्हावी, पेपरफुटीमागील दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशा मागण्याही विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर रोहित पवार यांचं एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा सातवा दिवस असतानाच पुलावर शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी पुणे बंदचा इशारा दिला आहे. भाजपने 'पुणे बंद करून दाखवा'चं आव्हान दिलं आहे. राहुल गांधींच्या भेटीची शक्यता आहे. आंदोलन उधळण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...