⚡ ब्रेकिंग News

'शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी-सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल'; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा


 'एक-एक गद्दाराचा काटा काढायचा विचार करावा लागेल'; 'आंदोलनातून रिकामं झाल्यानंतर एकेकाची मानगुट धरून जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही'; १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगामाला परवानगी दिल्यानंतर राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; '८ टक्के उसाचं गाळप करून तुम्हाला काय मिळणार?' असा सवाल

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या मागे राहायचं, का या गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल. भविष्यामध्ये या एक-एक गद्दाराचा काटा काढायचा विचार आपल्याला करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. इथेनॉलचे दर वाढवून मिळाले तर फायदा तुमचाच होणार आहे. साखरेची एमएसपी वाढली तर फायदा तुमचाच होणार आहे. आणि तुमच्यामध्ये दम नाही, तुमच्यात हिम्मत नाही लढण्याची म्हणून आम्ही लढतोय, अशा परिस्थितीमध्ये आमच्या आंदोलनाला अपशकुन करण्यासाठी, केंद्र सरकारला खूश करण्यासाठी तुम्ही जर कारखाने चालू करण्याचा प्रयत्न केला, तर काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे लक्षात ठेवा. आणि या आंदोलनातून रिकामं झाल्यानंतर एकेकाची मानगुट धरून त्याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडून १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगामाला परवानगी दिल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शेट्टी यांनी सांगितले की, या कारखानदारांना सगळं आम्ही आयतं करून द्यायला लागलो आहोत. एमएसपी वाढवून देत आहोत, इथेनॉलची किंमत वाढवून देत आहोत. केंद्र सरकार अडचणीत आलं आहे, त्यांना कसल्याही परिस्थितीत साखर पाहिजे आहे. आणि आमच्या अटी मान्य केल्याशिवाय, इथेनॉलचे दर वाढवल्याशिवाय, साखरेची एमएसपी वाढवल्याशिवाय कारखाने चालूच देऊ देणार नाही अशी आम्ही भूमिका घेतलेली आहे. अशा वेळी मूक संमती देऊन शेतकऱ्यांच्या मागे राहायचं, का या गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल. भविष्यामध्ये या एक-एक गद्दाराचा काटा काढायचा विचार आपल्याला करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

राजू शेट्टी म्हणाले की, कारखानदारांनी किमान तुमच्या फायद्याचा-तोट्याचा तरी विचार करावा. आज कुठलाही अडसाली असो की कुठलाही ऊस असो, ८ टक्क्यांवर रिकव्हरी लागायला तयार नाही. मी अनेक प्लॉटवर जाऊन रिकव्हऱ्या तपासलेल्या आहेत. मग ८ टक्के उसाचं गाळप करून तुम्हाला काय मिळणार आहे? १०.२५ टक्के रिकव्हरीला ६१५० रुपये एफआरपी ही तुम्हाला अनिवार्यच आहे, तुम्ही ८ टक्क्याचा ऊस गाळला तरी. म्हणजे टनाला पाठीमागे जवळपास ८०० रुपये एफआरपी तुम्हाला अतिरिक्त द्यावी लागणार आहे कोवळा ऊस तोडल्यानंतर. सरासरी रिकव्हरी कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांचाही तोटा होणार आहे. त्यामुळे ज्यांचा ऊस जाणार नाही त्यांनीसुद्धा जाब विचारला पाहिजे. 'तुमच्या धोरणामुळं आमचा जर का उसाचा दर कमी होणार असेल तर आम्ही सहन करणार नाही', हा जाब जे ऊस घालवत नाहीत त्यांनीसुद्धा विचारला पाहिजे, असे ते म्हणाले.

राज्य सरकारकडून १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगामाला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये साखरेची एमएसपी वाढवणे, इथेनॉलचे दर वाढवणे आणि एफआरपी वेळेवर देणे यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा शेट्टी यांनी घेतला आहे.

राजू शेट्टी यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला शेट्टी यांनी कारखानदारांना इशारा दिला असता, दुसऱ्या बाजूला सरकारने हंगामाला परवानगी दिली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही

राजू शेट्टी यांनी साखर सम्राटांना गर्भित इशारा दिला आहे. 'शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी-सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल' असे त्यांनी स्पष्ट केले. 'एक-एक गद्दाराचा काटा काढायचा विचार करावा लागेल' असा इशारा दिला. '८ टक्के उसाचं गाळप करून तुम्हाला काय मिळणार?' असा सवाल केला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...