⚡ ब्रेकिंग News

​पालकमंत्र्यांचे कार्यालय 'चकाचक', पण शेजारील स्वच्छतागृहाची 'दैनावस्था'; सांगली मुख्य प्रशाकीय कार्यालयातील भीषण वास्तव!

 

​पालकमंत्र्यांचे कार्यालय 'चकाचक', पण शेजारील स्वच्छतागृहाची 'दैनावस्था'; सांगली मुख्य प्रशाकीय कार्यालयातील भीषण वास्तव!

​सांगली:

एकीकडे शासकीय कार्यालयांमध्ये 'स्वच्छता अभियानाचा' मोठा गाजावाजा केला जात असताना, सांगली जिल्ह्याचे मुख्य प्रशासन कार्यालय मात्र याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे येथील कार्यालय एका बाजूला सर्वांगसुंदर आणि 'चकाचक' करण्यात आले आहे; मात्र त्याच कार्यालयाच्या अगदी शेजारी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची सध्या प्रचंड दैनावस्था झाली आहे.

​पालकमंत्र्यांच्या केबिनशेजारीच असलेल्या या स्वच्छतागृहात कमालीची अस्वच्छता पसरली आहे. येथील खिडक्या तुटलेल्या असून, पाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था नाही. साफसफाई अभावी संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

​"स्वच्छतेचा केवळ दिंडोरा पेटवणारे वरिष्ठ अधिकारी या गंभीर समस्येकडे डोळेझाक का करत आहेत?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. व्ही.आय.पी. (VIP) संस्कृती जपण्यात मग्न असलेले प्रशासन सामान्यांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या मूलभूत सुविधेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

 पालकमंत्र्यांच्या केबिनशेजारच्या स्वच्छतागृहाची जर ही भीषण अवस्था असेल, तर जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहांची काय स्थिती असेल? याचा विचारच न केलेला बरा.

​आता या सर्व प्रकरणावर खुद्द पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील लक्ष घालणार का आणि या दुर्गंधीयुक्त नरकयातनेतून नागरिकांची सुटका करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...