ऐतिहासिक क्षण: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आटपाडीच्या गोरडवस्तीला मिळाले नळ पाणी!
आटपाडी: विशेष प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६७ वर्षे उलटल्यानंतर, आटपाडी नगरपंचायत हद्दीतील गोरडवस्ती येथे अखेर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या वस्तीत नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला असून, ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला मोठे यश आले आहे.
सत्तांतराचा विकासात्मक परिणाम
पूर्वी आटपाडी ग्रामपंचायतीत असणारी आणि आता नगरपंचायतीत समाविष्ट झालेली गोरडवस्ती ही प्रामुख्याने धनगर समाज बहुल वस्ती आहे. येथील जनता मेंढपाळ आणि गलाई व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा नेते अमरसिंह (बापू) देशमुख, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर आणि जयदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. या सत्तापरिवर्तनानंतर वस्तीवरील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य देण्यात आले.
'हर घर जल' अभियानाची फलश्रुती
गोरडवस्तीतील युवक आणि नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती करत होते. ही समस्या नगरसेवकांनी गांभीर्याने घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हर घर जल' अभियानांतर्गत ही योजना मार्गी लावली. "नगराध्यक्ष आपल्या दारी... विकास प्रत्येक घरी" या संकल्पनेतून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन आज प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचले आहे.
बाळूमामा मंदिराच्या प्रांगणात जलपूजन
वस्तीवरील बाळूमामा मंदिराच्या प्रांगणात श्रीफळ वाढवून नळाच्या पाण्याचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी वस्तीतील अबालवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. "पाणी हा प्रत्येकाचा हक्क आहे" या भावनेतून गोरडवस्तीच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या ऐतिहासिक प्रसंगी आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यु.टी. जाधव सर, मुख्याधिकारी वैभव हजारे, गटनेते ऋषीकेश देशमुख, पाणीपुरवठा सभापती डॉ. जयंत पाटील, नगरसेवक महेश देशमुख, आबासाहेब नांगरे पाटील, युवा नेते चंद्रकांत काळे, उत्तम गोरड (शेठ), भाजपा किसान मोर्चाचे बाळासाहेब मेटकरी, विक्रांत पुजारी, दादा कोळेकर, दादा गोरड, प्रविण खांडेकर, आप्पा गोरड, नारायण पुजारी, आणि कर्मचारी शिवाजी नांगरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.