⚡ ब्रेकिंग News

२४ तासांत देश सोडा!"; इराणच्या हल्ल्याने संतप्त कतारची मोठी कारवाई, राजनैतिक अधिकाऱ्यांना हद्दपार करण्याचा इशारा

२४ तासांत देश सोडा!"; इराणच्या हल्ल्याने संतप्त कतारची मोठी कारवाई, राजनैतिक अधिकाऱ्यांना हद्दपार करण्याचा इशारा

इराण-अमेरिका युद्धाचा १९ वा दिवस; कतारच्या गॅस प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तणाव शिगेला, कतारकडून इराणी राजदूतावर 'पर्सोना नॉन ग्राटा'ची कारवाई, भारताच्या ४७ टक्के गॅस पुरवठ्यावर संकट

दोहा/तेहरान: इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने आता भीषण वळण घेतले आहे. युद्धाचा आज १९ वा दिवस असून इराणने केलेल्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या कतारने मोठा निर्णय घेतला आहे. कतारमधील इराणी राजदूतावरील सर्व अधिकाऱ्यांना २४ तासांच्या आत देश सोडण्याचा इशारा कतार सरकारने दिला आहे.

कतारची मोठी कारवाई

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या दूतावासाला पत्र पाठवून स्पष्ट केले आहे की, दूतावासातील सर्व सैन्य, सुरक्षा कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना 'पर्सोना नॉन ग्राटा' म्हणून घोषित करण्यात येत आहे. या निर्णयानुसार, सर्व इराणी अधिकाऱ्यांना २४ तासांच्या आत कतार सोडावे लागणार आहे. राजनैतिक भाषेत एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या अधिकाऱ्यांना आपल्या देशात राहण्यास मनाई केल्यास अशी कारवाई केली जाते.

इराणच्या हल्ल्याने पेटला संताप

ही कारवाई इराणने कतारच्या 'रास लाफान औद्योगिक शहरा'तील प्रमुख गॅस प्रकल्पावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर करण्यात आली आहे. इस्रायलने इराणच्या 'साउथ पार्स' गॅस फील्डवर हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून कतारच्या गॅस सुविधांना लक्ष्य केले. यापूर्वीच इराणने कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या तेल-गॅस प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी दिली होती.

भारताच्या गॅस पुरवठ्यावर संकट

या हल्ल्याचा थेट फटका भारताला बसला आहे. कारण कतारमधील याच गॅस प्रकल्पातून भारताच्या एकूण गॅस गरजेपैकी तब्बल ४७ टक्के एलपीजी गॅसचा पुरवठा होतो. रिफायनरीवरील या हल्ल्यामुळे जागतिक बाजारात गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. युद्ध आता अमेरिका, इस्रायल आणि इराणपुरते मर्यादित न राहता अनेक देशांना थेटपणे भाजू लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...