⚡ ब्रेकिंग News

गर्लफ्रेंडला रंग लावला म्हणून मित्राची रेल्वे रुळावर बांधून हत्या! होळीचा रंग ठरला खूनी


  गर्लफ्रेंडला रंग लावला म्हणून मित्राची रेल्वे रुळावर बांधून हत्या! होळीचा रंग ठरला खूनी

 क्षुल्लक वादातून युवकाचा क्रूर शेवट; दारू पाजून बेशुद्ध केले, रुळावर बांधले आणि अंगावरून घालवली ट्रेन

पाणीपत: होळीच्या रंगात मित्राने प्रेयसीला रंग लावल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची एवढी क्रूर हत्या करण्यात आली की शेवटी त्याचे तुकडे झाले. हरियाणातील पाणीपतमध्ये घडलेल्या या हृदयद्रावक प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

कशी घडली घटना?

कालू (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी संजू हा त्याचा मित्र असून, त्याच्या प्रेयसीला कालूने होळीच्या दिवशी रंग लावला होता. याच रागातून संजूने हत्येचा कट आखला. त्याने आपले इतर दोन साथीदार राहुल आणि विशाल यांच्यासोबत मिळून कालूला दारू पार्टीसाठी बोलावले.

प्लाननुसार झाली हत्या

आरोपींनी कालूला भरपूर दारू पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला रेल्वे रुळावर नेऊन गळ्यात स्क्रू ड्रायव्हर खुपसला. तरीही कालूचा मृत्यू झाला नाही, मग आरोपींनी त्याला जिवंत अवस्थेतच रेल्वे रुळाशी बांधून टाकले. काही वेळातच रेल्वेचा चाकाखाली आल्याने त्याचे तुकडे झाले.

 पघाताचा बनाव उघडकीस

हा प्रकार अपघात किंवा आत्महत्या असल्याचे दाखवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांना कालूच्या मोबाईल लोकेशनचा डेटा आणि आरोपींच्या संशयास्पद हालचालींवरून संशय आला. जीआरपीचे पोलीस अधिकारी धर्मपाल यांनी सांगितले की, कडक चौकशी केल्यानंतर तिन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला. जुन्या भांडणातून हा खून झाल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...