गळचेपी सहन नाही; राजीनाम्याची भूमिका! शिवसेना-भाजप युतीत तणाव साताऱ्यातून मुंबईत
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील ‘रडी’नंतर शिवसेना आमदार-मंत्री एकनाथ शिंदेंसमोर आक्रमक; भाजपनंही ‘तडजोड नाही’चा पवित्र
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या वादळाचे पडसाद आज (२३ मार्च) मुंबईत मंत्रालयात उमटले. संख्याबळ नसतानाही भाजपने ‘रडी’चा डाव खेळत आपला अध्यक्ष बसवल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री आणि आमदार अतिरेकी भूमिकेत दिसून आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी ‘सातत्याने आमची गळचेपी होत आहे’, ‘आम्ही राजीनामा देऊ’ अशी टोकाची भूमिका मांडली.
शिवसेना आमदार संतप्त, राजीनाम्याचा इशारा
शिवसेना मंत्री आणि आमदार साताऱ्यातील गैरप्रकाराविरोधात आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. सत्तेत असतानाही आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत या बैठकीत व्यक्त करण्यात आली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदेंसमोरच राजीनामा देण्याची भूमिका ठोकून दिली. या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबित केले.
मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री दालनात बैठका
अधिवेशनात सातारा प्रकरणाचे पडसाद उमटताच दोन्ही पक्षांनी आपापली बैठक बोलावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात भाजपचे आमदार आणि मंत्री जमले. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका मांडली. दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडत युतीतील तणाव अधोरेखित केला.
भाजपचा ‘तडजोड नाही’चा पवित्रा
शिवसेना आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही कठोर भूमिका घेतली आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पवित्रा भाजपकडून घेण्यात आला आहे. यामुळे युतीतील मतभेद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सातारा प्रकरणात एसपी निलंबित
विधान परिषदेत सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील अभूतपूर्व राड्याची गंभीर दखल घेत सभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले. तसेच, या प्रकरणाची चौकशी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडून करण्याचे निर्देश देण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेचे संख्याबळ काय होते?
एकूण जागा: ६५
बहुमतासाठी आवश्यक संख्या: ३३
भाजप: २७ (निवडणुकीनंतर ३३ पर्यंत)
राष्ट्रवादी: २०
शिवसेना: १५
काँग्रेस: १
अपक्ष: २
नेमकं काय झालं?
सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी युतीकडे ३५ जागा असूनही भाजपने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे ३ आणि १ अपक्ष असे एकूण ६ सदस्य फोडले. याशिवाय, इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. या यशस्वी ‘ऑपरेशन’मुळे भाजपचा उमेदवार अध्यक्षपदी विजयी झाला.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.