अजित पवारांच्या अपघातप्रकरणी अमोल मिटकरींचा सवाल; 'अशोक खरातचे असंख्य सीसीटीव्ही, पण दादांच्या बाबतीत एकही का नाही?'
'शेवटच्या श्वासापर्यंत ही सल कायम राहील'; निरोप समारंभात चर्चा न झाल्याची खंत, तुषार दोषी यांच्यावरही टीका
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी पुन्हा एकदा गंभीर भाष्य केले आहे. सरकार आणि प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विशेषतः नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले, मात्र अजित पवारांच्या अपघाताशी संबंधित एकही फुटेज का समोर येत नाही, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला.
विधानभवनात आयोजित निरोप समारंभात बोलताना मिटकरी म्हणाले, की आज या सभागृहात अजित पवार यांच्या विषयावर चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारला या घटनेचे गांभीर्य वाटत नसल्याने ही चर्चा झाली नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, "सीआयडी चौकशीत किती जबाब नोंदवले गेले? विमानातील कागदपत्रे जाळली गेली नाहीत पण ब्लॅकबॉक्स जळला, असा दावा केला जातो. सरकारची मनोवृत्ती असती तर या सगळ्याची चर्चा झाली असती. मात्र, सरकारला या प्रकरणाचे गांभीर्य नाही. माझ्या मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही सल कायम राहील."
आमदार मिटकरी यांनी अशोक खरात याच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, "अशोक खरात ही व्यक्ती नसून एक विकृती आहे. जोपर्यंत त्याचा खरा चेहरा समोर आला नव्हता, तोपर्यंत तो देव होता. चेहरा उघडकीस आल्यानंतर आता त्याच्याविरोधात तक्रारी होऊ लागल्या आहेत. ज्या समाजसुधारकांनी समाजासाठी हयात घालवली, अशा महाराष्ट्रात आता हे नकली लोक पुढे येत आहेत. एका श्वानाचा रंग भगवा असला की तो साधू होत नाही."
पोटनिवडणुकीबाबत बोलताना मिटकरी म्हणाले, की बारामतीकर सुदान आहेत. अजित पवार नसताना काँग्रेसने ही निवडणूक लढवली नसती. त्यांनी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.
शिवसेनेच्या भूमिकेचे कौतुक करताना मिटकरी म्हणाले, "शिवसेनेकडून शिकण्यासारखे आहे. शंभूराज देसाई यांच्यासाठी शिवसेना एकवटली. आमचे नेते, मंत्री, आमदार का आले नाहीत, हा प्रश्नच आहे. अजितदादांसाठी सर्व घटकपक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन मी करतो." तसेच, तुषार दोषी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की तुषार दोषी हे पात्र वादाचे आहे आणि त्यांनी अंतरवली सराटी येथे जे केले, ते इतिहासाला न समजणारे आहे.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.