मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचंय...'; सूरज चव्हाणला लागले साऊथ इंडस्ट्रीचे वेध, म्हणाला, 'सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला तर...'
बिग बॉस मराठी विजेत्याने व्यक्त केली दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा; 'माझा लूक तिथल्या लोकांसारखाच', अशी प्रतिक्रिया
'बिग बॉस मराठी ५' या रिअॅलिटी शोची ट्रॉफी मिळवून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला गुलिगत स्टार सूरज चव्हाण आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या इच्छेने सज्ज झाला आहे. अगदी साध्या आणि गरीब परिस्थितीतून यशाचे शिखर गाठलेल्या सूरजला आता साऊथ इंडस्ट्रीत काम करण्याचे वेध लागले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने ही इच्छा मोकळेपणाने व्यक्त केली आहे.
बिग बॉसचे विजेतेपद मिळवल्यानंतर सूरजने प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'झापुक झुपूक' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नसला, तरी सूरजची चर्चा मात्र सातत्याने होत आहे. आता मात्र त्याने आपल्या करिअरचे पुढचे पाऊल दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळवण्याचा मानस बोलून दाखवला आहे.
'हॉट सीट टॉक्स' या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सूरज चव्हाण म्हणाला, "मला दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करायचंय आणि माझी खूप इच्छा आहे. मी ते नक्कीच करेन. मला एकदा तरी साऊथ सिनेमात काम करायचंय. तिथल्या सिनेमांमधील अॅक्शन मला खूप आवडते. 'बिग बॉस'च्या घरातही मी अशीच अॅक्शन केली होती."
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आवडत्या अभिनेत्याबद्दल विचारले असता सूरज म्हणाला, "मला अल्लू अर्जुन आवडतो. त्याच्याबरोबर मला काम करायचंय. तो एकच सिनेमा करतो, पण त्याचं काम भारी असतं. माझंही तसंच आहे. मी एकदाच काम करतो आणि टॉपचं काम करतो. आईची इच्छा असेल तर सगळं होईल."
सूरजने पुढे सांगितले की, त्याचा लूक दाक्षिणात्य लोकांसारखा आहे. तो म्हणाला, "सयाजी शिंदेंशी माझी संपर्क झाला, तर मी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नक्कीच जाईन. ते मला ओळखत असणार, पण एकदा त्यांचा नंबर मिळाला तर काम नक्की होईल." अशा शब्दांत त्याने साऊथ इंडस्ट्रीत जाण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.