⚡ ब्रेकिंग News

भोंदूगिरीचा फटका; रुपाली चाकणकरांची गच्छंती, आता महिला आयोगाचा पुढचा चेहरा कोण? रोहित पवारांनी सुचवली 'ही' चार नावे


भोंदूगिरीचा फटका; रुपाली चाकणकरांची गच्छंती, आता महिला आयोगाचा पुढचा चेहरा कोण? रोहित पवारांनी सुचवली 'ही' चार नावे

अशोक खरात प्रकरणानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागल्याने नव्या अध्यक्षेच्या निवडीची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठी नावे पुढे केली आहेत.

नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात  याच्याशी असलेल्या जवळिकीमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. खरातला 'गुरुमाऊली' मानून त्याची पाद्यपूजा करणं चाकणकरांना महागात पडलं असून, या प्रकरणावरून महायुती सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. आता या महत्त्वाच्या पदावर नवी अध्यक्षा कोण, याची चर्चा रंगली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चार महत्त्वाची नावे सुचवली आहेत.

चमकोगिरी नको, अभ्यासू नेतृत्व द्या!

रोहित पवार यांनी रुपाली चाकणकर यांच्या कार्यकाळातील 'चमकोगिरी'वर सडकून टीका केली. महिला आयोगाला राजकीय आखाडा न बनवता तिथे निष्पक्ष आणि कायद्याचे सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील अध्यक्षेसाठी रोहित पवारांनी सुचवलेली संभाव्य नावे खालीलप्रमाणे आहेत:

मीरा बोरवणकर: निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी, ज्यांची ओळख निर्भीड आणि कडक प्रशासक म्हणून आहे.

ॲड. वर्षा देशपांडे: सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या.

मनिषा गुप्ते: 'मासूम' संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय.

मेधा गाडगीळ: प्रशासकीय अनुभव असलेल्या निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी.

निर्णय 'सुनेत्रा काकीं'नीच घ्यावा, भाजपचा हस्तक्षेप नको?

पुढच्या अध्यक्षांची निवड करताना रोहित पवारांनी एक महत्त्वाची भूमिका मांडली आहे. "हा निर्णय सर्वस्वी सुनेत्रा काकींनाच (सुनेत्रा पवार) घ्यायचा आहे," असे सांगत त्यांनी या प्रक्रियेत कोणीही ढवळाढवळ करू नये, असा सूचक इशारा दिला आहे. सुनेत्रा पवार या महिलांच्या प्रश्नावर योग्य आणि अराजकीय निर्णय घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पाद्यपूजा ते राजीनामा

अशोक खरातला पांडुरंग मानून त्याचे आशीर्वाद घेणारे रुपाली चाकणकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खरातचे काळे कारनामे आणि अघोरी कृत्ये समोर आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एका भोंदू बाबाची पाठराखण करणे सरकारला अडचणीचे ठरले. परिणामी, त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.

रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत लिहिले आहे की, "राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे. तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल..! हा निर्णय सर्वस्वी मा. सुनेत्राकाकींना घ्यायचाय आणि त्या योग्य निर्णय घेतील, ही अपेक्षा!"

एखाद्या वाईट घटनेतून (खरात प्रकरण) जर आयोगाला मीरा बोरवणकर किंवा मेधा गाडगीळ यांच्यासारख्या सक्षम महिला अध्यक्षा मिळाल्या, तरच राज्यातील पीडित महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...