⚡ ब्रेकिंग News

भीषण अपघात! आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हल बसला डंपरची धडक


 भीषण अपघात! आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हल बसला डंपरची धडक

१३ जण जिवंत जळून कोळसा, २२ जखमी; आग नियंत्रित होण्यास लागले ३ तास

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यातील रायवरमजवळ आज (२६ मार्च २०२६) पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. तेलंगणातील निर्मल येथून नेल्लोरकडे जाणाऱ्या हरिकृष्णा ट्रॅव्हल्स या खासगी बसमला डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत १३ प्रवासी जिवंत जळून मृत्यूमुखी पडले.

पोलिसांनी सुरुवातीला १४ मृत्यूंची माहिती दिली होती, मात्र नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने १३ मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. डंपर चालकासह २२ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल ३ तास लागले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांबद्दल दुःख व्यक्त केले आहे. घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 इतर अपघातांची पार्श्वभूमी

२५ डिसेंबर २०२५, कर्नाटक (चित्रदुर्ग): स्लीपर बसला लॉरीची धडक, ६ जण जिवंत जळाले (४ महिला, १ लहान मूल, १ लॉरी चालक).

५ नोव्हेंबर २०२५, राजस्थान (जैसलमेर): एसी स्लीपर बसला शॉर्ट सर्किटमुळे आग, २० प्रवासी जिवंत जळाले.

२६ मार्च २०२६, बांगलादेश: प्रवासी बस पद्मा नदीत कोसळली, २३ जणांचा मृत्यू, ११ जण बचावले.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...