⚡ ब्रेकिंग News

दारणा धरणातून शिवनिका संस्थानासाठी ३९ लाख लिटर पाण्याचे आरक्षण; कोविड काळातील निर्णयाने उपस्थित होतोय प्रश्न.

 दारणा धरणातून शिवनिका संस्थानासाठी ३९ लाख लिटर पाण्याचे आरक्षण; कोविड काळातील निर्णयाने उपस्थित होतोय प्रश्न.

 खरातवर ठाकरे सरकारचीही मेहेरबानी? शिवनिका संस्थानला शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी दिलं, कॅप्टन खरातचा मविआ काळातही दबदबा?

नाशिक : स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यानंतर आता तपासाचा फोकस त्याच्या आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय संबंधांकडे वळला आहे. या पार्श्वभूमीवर, तत्कालीन महाविकास आघाडी (मविआ) सरकारच्या काळात खरात याच्या संस्थेला शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारणा धरणातून 'श्री शिवनिका संस्थान'साठी पाणी आरक्षित करण्यात आल्याच्या निर्णयाने ठाकरे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

३१ जुलै २०२० रोजी झाला शासन निर्णय

जलसंपदा विभागाने ३१ जुलै २०२० रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या अशोक खरातच्या 'श्री शिवनिका संस्थाना'साठी बिगर सिंचन वापरासाठी ०.००३९ दशलक्ष घनमीटर (सुमारे ३९ लाख लिटर) पाणी आरक्षित करण्यात आले होते. हे पाणी दारणा धरणाच्या गोदावरी उजवा तट कालव्याच्या (किमी ४८) माध्यमातून उचलण्यास मंजुरी देण्यात आली होती. हा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता.

कोविड काळात संस्थानासाठी दिले पाणी

विशेष म्हणजे, हा कालावधी कोविड संकटाचा होता. राज्यातील अनेक भागात पाण्याची टंचाई असताना, एका खाजगी संस्थानासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आरक्षित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निर्णयासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची मंजुरी घेण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

'लेटर ऑफ सपोर्ट'नुसार आरक्षण, पण प्रत्यक्ष पाणीपुरवठा?

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णयातील अटी. अट क्रमांक ८ नुसार, हे आरक्षण 'लेटर ऑफ सपोर्ट' स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच प्रत्यक्ष पाणीपुरवठा हा धरणातील उपलब्ध साठ्यावर अवलंबून असतो. मात्र, या पत्राचा वापर करून संस्थानने स्वतःचे प्रभावी 'प्रस्थ' निर्माण केले का, असा संशय व्यक्त केला जात आहे.

राजकीय व्यक्तींचा दबाव होता का?

दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेत मंत्रालयातील अधिकारी आणि काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींचा दबाव होता का, याबाबतही चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरातने आपल्या तथाकथित 'दैवी शक्ती' आणि 'बाधा निवारण'च्या माध्यमातून काही राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रभाव निर्माण केला होता. याच प्रभावामुळे पाणी मंजुरीची प्रक्रिया वेगाने पार पडली का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्थानिक शेतकऱ्यांकडून संताप

सिन्नरच्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना, एका संस्थानाला पाणी आरक्षित करण्यामागील निकष काय होते, याबाबत स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे. संबंधित आमदार, खासदार किंवा मंत्र्यांच्या 'लेटर ऑफ सपोर्ट'मुळेच हा निर्णय झाला का, याचीही चौकशी होण्याची मागणी होत आहे. तसेच, आरक्षित करण्यात आलेले पाणी प्रत्यक्षात वापरले गेले का, त्यासाठी आवश्यक शुल्क भरले गेले का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ५ जानेवारी २०२० रोजी गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून या प्रस्तावाची हालचाल सुरू झाली होती, अशी माहितीही समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...