फोर्ट मॅकनेअरवर रात्रीच्या वेळी संशयास्पद ड्रोन दिसल्याने खळबळ; रुबियो-हेगसेथ यांच्या शिफ्टिंगचा विचार, देशातील लष्करी तळांवर 'चार्ली' अलर्ट
इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेची सुरक्षा व्यवस्था हायअलर्टवर आली असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. वॉशिंग्टनमधील फोर्ट लेस्ली मॅकनेअर या अत्यंत संवेदनशील लष्करी तळावर, जिथे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ वास्तव्यास आहेत, तेथे संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या घातल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली असून दोन्ही मंत्र्यांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
'वॉशिंग्टन पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, गेल्या १० दिवसांत फोर्ट मॅकनेअरवर रात्रीच्या वेळी अनेकदा हे ड्रोन दिसून आले. या ड्रोनची ओळख आणि ते कुठून आले याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे सुरक्षा सतर्कता आधीच वाढवण्यात आली असताना ही घटना घडल्याने अधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या घटनेनंतर रुबियो आणि हेगसेथ यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा विचादेखील सुरू आहे, मात्र अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अमेरिकी लष्करी तळांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. न्यू जर्सीमधील जॉइंट बेस मॅकगायर-डिक्स-लेकहर्स्ट आणि फ्लोरिडामधील मॅकडिल एअर फोर्स बेस येथील सुरक्षा पातळी वाढवून 'चार्ली' करण्यात आली आहे, याचा अर्थ हल्ला किंवा मोठा धोका अगदी जवळ आला आहे. यूएस सेंट्रल कमांडचे मुख्यालय असलेला मॅकडिल एअर फोर्स बेस या आठवड्यात सुरक्षेच्या कारणास्तव दोनदा बंद करण्यात आला होता. याशिवाय, जगभरातील अमेरिकी दूतावासांनाही सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सहा महिन्यांपूर्वीच संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचे फोर्ट मॅकनेअरवरील निवासस्थान उघड करण्यात आले होते, ज्यामुळे आता सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाला आहे. साधारणपणे, अशा उच्चपदस्थ व्यक्तींची ठिकाणे गुप्त ठेवली जातात. यापूर्वीही २०२० मध्ये कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर आणि २०२४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्या रॅलीत अशाच प्रकारच्या ड्रोनच्या घटना घडल्या होत्या. त्या वेळी इराणकडून सूडाची भीती व्यक्त करण्यात आली होती.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.