⚡ ब्रेकिंग News

अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं; चर्चाही करू नये! भिडे गुरुजींची आक्रमक प्रतिक्रिया

अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं; चर्चाही करू नये! भिडे गुरुजींची आक्रमक प्रतिक्रिया

“खरात प्रकरणावर बोलायचेच नाही, मारून टाकून मोकळे व्हा”  भिडे गुरुजींच्या तोंडून धक्कादायक विधान; नाशिक भोंदूबाबा प्रकरणात तपासाला वेग, बँक खाती सील, मालमत्ता तपास सुरू

पुणे: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभर तापले असताना, यावर प्रसिद्ध भिडे गुरुजी यांनी अतिशय आक्रमक आणि धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

भिडे गुरुजी म्हणाले,  

“अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, खरात प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये.”

अनेक राजकीय नेते, बडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी खरातच्या भेटीला जात असल्याचे फोटो समोर आल्यानंतर वातावरण तापले असताना, भिडे गुरुजींच्या या विधानाने मोठी चर्चा निर्माण झाली आहे.

तपासात नवे वळण

अशोक खरात प्रकरणातील तपासाला वेग आला असून, खरातच्या सर्व संस्थांचे बँक अकाउंट सील करण्यात आले आहेत. त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. विशेष तपास पथक (SIT) ने मालमत्तेची माहिती मागवली असून, खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमिनी, घरं, दुकाने यांची राज्यभर चौकशी सुरू आहे. कोट्यवधी रुपयांच्या बेनामी मालमत्तेचा शोध घेतला जात आहे.

इतर महत्त्वाचे अपडेट्स:

 बड्या आयुर्वेदिक औषधे आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. खरातने हरिणाची कस्तुरी आणि दुर्मीळ जडीबुट्या खरेदी केल्याचा संशय आहे.

 नाशिकरोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर आहे. बनावट रत्नांची खरेदी केल्याचे पुरावे मिळाले आहेत.

 खरातच्या मोबाईल आणि व्हॉट्सअॅप डेटा रिकव्हर करण्यासाठी सायबर पोलिस प्रयत्न करत आहेत.

 आतापर्यंत दाखल झालेले १० गुन्हे एकत्रितपणे SIT च्या माध्यमातून तपासले जाणार आहेत.

 नाशिक क्राईम ब्रँचकडून DVR, CCTV फुटेज, लॅपटॉप आणि सर्व कागदपत्रे SIT ने ताब्यात घेतली आहेत.

भिडे गुरुजींच्या या आक्रमक विधानानंतर खरात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तपास यंत्रणा पुढील २-३ दिवसांत मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. 

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...