बिग बींचे रात्री ३:४१ वाजता ट्विट करत म्हणाले, 'T-5687, अरे भावा...'; नेटकरी म्हणाले, "काका, आता झोपा, सकाळी सकाळी कोडी सोडवू नका"
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पहाटेच्या प्रहरात केलेल्या एका गूढ ट्विटने चाहते आणि नेटकऱ्यांना कोड्यात टाकले आहे. ८३ व्या वर्षीही सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या बिग बींनी आज पहाटे ३:४१ वाजता त्यांच्या एक्स अकाउंटवर (पूर्वीचे ट्विटर) एक संदेश पोस्ट केला, ज्याचा नेमका अर्थ कुणालाही लागलेला नाही.
काय आहे ट्विट?
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, "T-5687, अरे भावा... जे तू बोलतोय, ते तुला तरी समजतंय का?" या एकाच ओळीत त्यांनी नेमकं कुणाला उद्देशून हे ट्विट केले आहे, हा उलगडा मात्र कोणालाच होऊ शकलेला नाही. टी-५६८७ म्हणजे नेमकं काय, हे देखील एक कोडेच बनले आहे.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
या गूढ ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका यूजरने मिश्कीलपणे लिहिले, "अहो काका, आता झोपा.. सकाळी सकाळी कशाला कोडी सोडवत आहात?" तर दुसऱ्या एकाने लिहिले, "अमितजी, तुम्ही या गोष्टी थेट तुमच्या पत्नीला सांगू शकता. पहाटे ३ वाजता कोण ट्विट करतं?"
एका चाहत्याने प्रश्न केला, "अमितजी रात्र झाली आहे. तुम्हाला झोप नाही येत का? एवढ्या रात्री तुम्ही कुणाला समजावून सांगत आहात?" तर आणखी एका यूजरने थेट अमिताभ यांनाच प्रश्न विचारला, "हा प्रश्न आमचाही आहे, तुम्ही जे काही लिहिलं आहे, ते तुम्हाला तरी समजतं आहे का सर?"
काय असू शकतो यामागचा उद्देश?
अमिताभ बच्चन यांची अशी गूढ ट्विट्स करण्याची शैली अनेकदा चर्चेत येते. कधी ती त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनशी संबंधित असते, तर कधी ती केवळ त्यांच्या मनातील विचारांचा भाग असते. मात्र, या ट्विटमागचा नेमका उद्देश काय, हे अद्याप अस्पष्ट आहे. टी-५६८७ हा क्रमांक त्यांच्या आगामी प्रोजेक्टचा कोड आहे की काही वैयक्तिक संदेश, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. चाहते मात्र या कोड्याचा उलगडा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.