कथित व्हिडीओची सत्यता तपासल्यानंतरच कारवाई; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले - ३-४ व्हिडीओ जोडून बनवला असल्याचा झिरवळांचा दावा, तक्रार करा
मुंबई: राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले की, नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही
पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेनुसार, “दरवेळी आरोप झाले की लगेच राजीनामा घेणे योग्य नाही.” त्यामुळे व्हिडीओ प्रकरणात तात्काळ राजीनामा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “नरहरी झिरवाळ यांनी मला फोन करून सांगितले की, हा व्हिडीओ ३-४ वेगवेगळ्या व्हिडीओ एकत्र जोडून बनवण्यात आला आहे. मी त्यांना सांगितले की, तक्रार दाखल करा. व्हिडीओची सत्यता (शाहनिशा) तपासली जाईल.”
फडणवीस पुढे म्हणाले, “व्हिडीओ गंभीर आहे. त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल. त्यानंतर सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून योग्य तो निर्णय घेऊ.”
खरात प्रकरणावरही इशारा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख करताना इशारा दिला. ते म्हणाले, “फोटो-व्हिडीओ आले तरी त्यावरून लगेच निष्कर्ष काढता येत नाहीत. सहभाग असेल तर कोणालाही सोडले जाणार नाही. आर्थिक फसवणूक झाल्याने लोक पुढे येत आहेत. दुर्दैवी महिला पीडित आहेत. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणे ही गोपनीयतेचा भंग आहे. असे करणाऱ्यांवर कारवाई होईल.”
पार्श्वभूमी
नरहरी झिरवाळ यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते.
मात्र, सध्याच्या प्रकरणात पक्षाने झिरवाळ यांना अभय दिले असून, व्हिडीओची सत्यता तपासल्यानंतरच पुढील कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.