⚡ ब्रेकिंग News

‘नटरंग’, ‘चंद्रमुखी’नंतर आता पडद्यावर उमलणार ‘फुला’; वाघ्या-मुरळीच्या लोकसंस्कृतीचा अस्सल प्रवास!

 

पुढच्या महिन्यात रसिक प्रेक्षकांना मिळणार संगीताची भरभक्कम मेजवानी; १७ एप्रिलला चित्रपट चित्रपटगृहात होणार प्रदर्शित.


मुंबई: मराठी सिनेसृष्टीत 'नटरंग', 'चंद्रमुखी' आणि अलीकडेच आलेल्या 'फुलवंती' सारख्या चित्रपटांनी लावणी आणि लोककलेचा वारसा मोठ्या पडद्यावर दिमाखात मांडला. याच परंपरेचा पुढचा वारसा जपत, वाघ्या-मुरळीच्या पारंपारिक लोकसंस्कृतीचा वेध घेणारा 'फुला' हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 'फुला'ची पहिली झलक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 'फुला'ची पहिली झलक पाहायला मिळते. कपाळावर भंडारा आणि डोळ्यांत दाटलेले पाणी, अशा भावूक रूपात फुला दिसत आहे. एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची ही संघर्षमय कथा असून, तिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि तिच्यावर आलेले संकट याभोवती चित्रपटाचे कथानक फिरताना दिसते.

सात गाण्यांचा सांगीतिक नजराणा

'फुला' चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यातील सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम. बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटात संगीताची अशी मेजवानी मिळणार आहे. यात प्रामुख्याने खालील गाणी ऐकायला मिळतील:

  • काना तुझी बासरी

  • माजा राजा बल्लारी

  • आसरा तू माझ्या जीवाचा

  • कुंकू कोरल कपाळी

  • मुरळी झाली ग मी बाई

  • कपाळी सजलं बाशिंग

  • डर्बीचा थरार

या गाण्यांना वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत आणि आकाश नवगिरे यांसारख्या दिग्गज गायकांनी स्वरसाज चढवला आहे, तर समाधान ऐवळे यांनी संगीत दिले आहे.

आटपाडीच्या तरुणांची मोठी झेप

विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील नवोदित तरुणांनी एकत्र येऊन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून, अभिषेक जावीर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथालेखन केले आहे. रवी किरण जावीर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.

तमाशा फड, जागरण-गोंधळ आणि वाघ्या-मुरळीची परंपरा अशा ग्रामीण संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा चित्रपट १७ एप्रिलला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...