'धुरंधर 2'मध्ये पंतप्रधान मोदींचा कॅमिओ? समोर आलं सत्य; भाषणाचा व्हायरल सीन चर्चेत
आदित्य धर दिग्दर्शित सिनेमात २०१४ च्या भाषणाचा वापर; सोशल मीडियावर 'मोदींचा डेब्यू' म्हणत प्रतिक्रियांना उधाण
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र, या चर्चेला आणखी एक वेगळं वळण मिळालं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दृश्यामुळे या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅमिओ असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, ही चर्चा नेमकी किती खरी, हे समोर आलं आहे.
'धुरंधर २' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झलक नक्कीच पाहायला मिळते, पण तो प्रत्यक्ष अभिनय केलेला कॅमिओ नाही. सिनेमात वापरण्यात आलेले हे फुटेज म्हणजे २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी दिलेल्या भाषणाचा एक भाग आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी हे वास्तविक फुटेज सिनेमात अशा पद्धतीने एडिट केले आहे की, तो एक प्रेरणादायी आणि देशभक्तीपर सीन वाटतो. यामुळे सिनेमाला एक वेगळाच देशभक्तीपर टच मिळाला आहे.
या छोट्याशा दृश्याने सोशल मीडियावर मात्र तुफान प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी याला 'मोदींचा सिनेसृष्टीतला डेब्यू' असे म्हटले आहे. काहींनी या दृश्याचे कौतुक करत ते सिनेमातील सर्वात प्रभावी आणि भावस्पर्शी दृश्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. दुसरीकडे, काही युजर्सनी अशा प्रकारच्या वास्तविक फुटेजचा वापर करताना योग्य श्रेय दिले गेले का, याबाबत प्रश्नही उपस्थित केले आहेत. या सर्व चर्चांमुळे 'धुरंधर २' चित्रपटाची प्रसिद्धी आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.