टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. 2007 पासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली. यंदाचं 10वं पर्व असून या स्पर्धेतील तीन विक्रम अजूनही अबाधित आहेत. तसेच विक्रम मोडणंही कठीण आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून महिनाभर जेतेपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत काही विक्रम रचले आणि काही विक्रम मोडले जाणार यात काही शंका नाही. 2007 पासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात झाली आहे. दर दोन वर्षांनी स्पर्धा होत असते. यंदा स्पर्धेचं दहावं पर्व असून भारत आणि श्रीलंकेकडे यजमान पद आहे. आतापर्यंत सहा संघांनी जेतेपदाची चव चाखळी आहे. भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया या संघाना जेतेपद मिळालं आहे. तर भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांची दोनदा जेतेपद मिळवलं आहे. दुसरीकडे, आतापर्यंत या स्पर्धेत तीन विक्रम अबाधित आहेत. हे विक्रम मोडणं तसं पाहिलं तर खूपच कठीण आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत वेगवान अर्धशतक : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम अष्टपैलू युवराज सिंगच्या नावावर आहे. या स्पर्धेच्या पहिल्या पर्वात त्याने इंग्लंडविरुद्ध अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तसेच 16 चेंडूत 58 धावा खेळी केली होती. यात त्याने एका षटकात 6 षटकार ठोकत खळबळ उडवून दिली होती. युवराज सिंगने 362.50 च्या स्ट्राईक रेटने 3 चौकार आणि 7 षटकार मारत हा विक्रम रचला होता.

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.