क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
पुणे : पुण्यातील एमपीएससी आंदोलनात शेवटपर्यंत विद्यार्थ्यांची बाजू आक्रमकपणे लावून धरणाऱ्या विवेकानंद पाटील यांनी रविवारी मध्यरात्री सगळ्या मागण्या मान्य होताच एकच जल्लोष केला. या आंदोलनाच्या काळात विवेकानंद पाटील आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यातील वाकयुद्ध चांगलेच गाजले होते. काल सरकारने विद्यार्थ्यांच्या जवळपास सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर विवेकानंद पाटील यांनी आंदोलनातील नेत्यांना सातत्याने लक्ष्य करणाऱ्या नवनाथ बन आणि विक्रम पाचपुते यांच्यासोबतचा हिशेब चुकता केला. हा विद्यार्थी एकजुटीचा विषय आहे. आमच्या एकीचा विषय झाला आहे. ज्यांना ही गाढवं अर्बन नक्षल वाटत होती, त्यांना मी सांगू इच्छितो की, भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, असे विवेकानंद पाटील यांनी म्हटले.
मी नवनाथ बनला सांगेन, आम्ही वाघ आहोत, गाढव नाहीत, शिकार केलेय. कोणाच्या पण नादाला लागायचं, आमच्या नादाला लागायचं नाही, असा सणसणीत टोलाही विवेकानंद पाटील यांनी यावेळी लगावला. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. ११ दिवसांनी का होईना त्यांनी संवेदनशीलता दाखवून निर्णय घेतला. शिवेंद्रराजे भोसले यांचेही आम्ही आभारी आहोत. आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. आम्ही चौकशीसाठी सरकारला ६० दिवस मुदत दिली आहे. तोपर्यंत विवेक भीमनवार हे पदावर नसतील. त्यांनी आता आयुष्यभरासाठी सुट्टी घ्यावी, असेही विवेकानंद पाटील यांनी म्हटले.
विवेक भीमनवार यांचा राजीनामा न झाल्यामुळे काल सुरुवातीला विद्यार्थी नाराज होते. मात्र, नंतर भीमनवार चौकशीपर्यंत पदावर नसतील, या प्रस्तावाला विद्यार्थ्यांनी संमती दिली. याशिवाय, सरकारने पदभरतीच्या जागा वाढवल्या आहेत. आता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे, तीन तारखेला परीक्षा आहे. बाकी तुमची रस्त्यावरची लढाई आम्ही लढू, असेही विवेकानंद पाटील यांनी म्हटले.
गेल्या ११ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. रविवारी रात्री शिवेंद्रराजे भोसले हे सरकारच्यावतीने विद्यार्थ्यांशी मध्यस्थी करायला पोहोचले होते. त्यानंतर तब्बल तीन तास शिवेंद्रराजे भोसले आणि विद्यार्थ्यांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. सुरुवातीला विवेक भीमनवार यांचा राजीनामा वगळता सर्व मागण्या केल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर केले. मात्र, विद्यार्थी भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे ते आंदोलन मागे घ्यायला तयार नव्हते. अखेर रात्री १ वाजून २४ मिनिटांनी विवेक भीमनवार यांनी ट्विट करुन आपण पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पदावरुन दूर राहणार असल्याचे स्पष्ट केले. हे म्हणजे सरकारने भीमनवार यांना एकप्रकारे सक्तीच्या रजेवर पाठवण्यासारखे होते. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आंदोलन स्थगित केले.
आंदोलकांचा राजीनाम्यासाठी आग्रह होता, पण सरकारनं चौकशी समिती नेमली. चौकशी होईपर्यंत अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर राहतील. भीमनवार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीस दोन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. दिलीप भोसले चौकशी समितीचे अध्यक्ष असून तुकाराम मुंढेही समितीवर आहेत. एमपीएससीतील आजी-माजी अध्यक्षांपासून शिपायांपर्यंतच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देण्यात आले आहे. तीन वर्षात ७० हजार रिक्त पदे भरु असं आश्वासन देण्यात आले आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या गट क च्या पदांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. मागण्या मान्य करत असलेल्या पत्रावर मुख्य सचिवांची सही करण्यात आली आहे. तहसीलदार भरतीत ६०-४० ऐवजी ५०-५० चा रेश्यो करण्यात आला आहे. आयोगाची सदस्य संख्या ११ पर्यंत वाढवली जाणार आहे. एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याचेही मान्य करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्याचे सांगितले जात असता, दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एमपीएससी आंदोलनाला यश आल्यानंतर विवेकानंद पाटील यांनी नवनाथ बन आणि विक्रम पाचपुते यांना सणसणीत टोला लगावला. 'भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत' असे ते म्हणाले. 'आम्ही वाघ आहोत, गाढव नाहीत, शिकार केलेय' असेही ते म्हणाले. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार' असेही त्यांनी सांगितले. 'आम्ही चौकशीसाठी सरकारला ६० दिवस मुदत दिली आहे' असेही ते म्हणाले. रविवारी मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांनी विवेक भीमनवार यांनी ट्विट करून चौकशी होईपर्यंत पदावरून दूर राहणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आंदोलन स्थगित केले. सरकारने अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.


إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.