क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
मुंबई : बॉलिवूडचा 'बिग बी' अर्थात अमिताभ बच्चन यांना विशेष ओळखीची गरज नाही. त्यांच्या चाहतावर्गाचं जाळ सातासमुद्रापार पसरलं आहे. अमिताभ बच्चन यांची विशेष ओळख अँग्री यंग मॅन आणि हाईटमुळे तयार झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांची ६ फूट १.५ इंच हाईट असल्याची माहिती आहे. त्यांच्या हाईटचं विशेष कौतुक होतं. पण तुम्हाला ठाऊक आहे का? एक काळ असा होता, जेव्हा त्यांचं रुप आणि हाईट त्यांच्या कारकिर्दीत अडसर ठरत होती. अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती १८'मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी आपल्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण काढली. तसेच काही जबरदस्त किस्से शेअर केले.
सुरुवातीला फिल्म मेकर्स आणि प्रॉड्यूसर्स अमिताभ बच्चन यांची हाइट आणि लहान चेहरा असल्यामुळे चिंतेत होते. हाइटमुळे त्यांना काम मिळण्यात अडचण निर्माण झाली होती. या कारणामुळे त्यांनी केस लांब करण्यास सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये स्ट्रगल काळातील किस्सा सांगितला. खरंतर, 'कौन बनेगा करोडपती १८'च्या नुकतंच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये, विनम्र नावाची कंटेस्टंटने अमिताभ बच्चन यांना आपल्या आयकॉनिक हेअरस्टाईलबाबत प्रश्न विचारला. विनम्रने सांगितलं की, त्याचे आजोबा फिल्म डिस्ट्रीब्यूटर होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढली.
आपली हेअरस्टाइल फॅशन नाही तर, एका विशिष्ट कारणामुळे ठेवली असल्याचं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन म्हणाले की, "जेव्हा मी पहिल्यांदा सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा काम मिळवण्यासाठी फिल्ममेकर्स आम्हाला दोन गोष्टी सांगायचे, एक म्हणजे माझी हाईट असल्यामुळे कोणतीही अभिनेत्री काम करणार नाही. दुसरं म्हणजे माझा लहान चेहरा. माझा चेहरा भरलेला दिसावा म्हणून, मी केस वाढवले. मी कानाच्या इथेही मी केस वाढवले, ज्यामुळे चेहरा भरलेला दिसेल", असं अमिताभ बच्चन म्हणाले.
अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली रिलीज झालेल्या 'सात हिंदुस्तानी' या सिनेमातून अॅक्टिंग डेब्यू केलं. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अनवर अली नावाच्या कवीची भूमिका साकारली. यानंतर अमिताभ बच्चन यांनी 'रेश्मा और शेरा', 'परवाना', 'संजोग', 'बंसी बिरजू' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. खरंतर, सुरुवातीच्या काळात त्यांची बरीच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालली नाही. पण हळूहळू बॉक्स ऑफिसवर त्यांच्या चित्रपटांची जादू चालली. 'आनंद' (१९७१), आणि 'बॉम्बे टू गोवा' (१९७२) या दोन्ही चित्रपटांनी अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला पुढे नेण्यास मदत केली. 'आनंद' या सिनेमातील अमिताभ बच्चन यांची भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं.
अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील मोठा टर्न १९७३ साली रिलीज झालेल्या 'जंजीर' या सिनेमामुळे मिळाला. या सिनेमात त्यांनी पोलीस ऑफिसर विजय खन्ना यांची भूमिका साकारली. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्यांची 'अँग्री यंग मॅन' अशी इमेज तयार झाली होती. यानंतर अमिताभ बच्चन यांनी 'दीवार', 'शोले', 'अमर अकबर अँथनी', 'डॉन', 'मुकद्दर का सिकंदर' यांसारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलं. या सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजल्या.
अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील संघर्षाची कहाणी प्रेरणादायी आहे. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र, त्यांनी हार मानली नाही आणि सातत्याने प्रयत्न करत राहिले. अखेर त्यांना यश मिळाले आणि ते बॉलिवूडचे सुपरस्टार बनले.
अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती १८'मध्ये आपल्या स्ट्रगलचा किस्सा सांगितला. 'सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली तेव्हा फिल्ममेकर्स दोन गोष्टी सांगायचे — माझ्या हाईटमुळे कोणतीही अभिनेत्री काम करणार नाही आणि माझा लहान चेहरा' असं ते म्हणाले. 'चेहरा भरलेला दिसावा म्हणून केस वाढवले' असंही त्यांनी सांगितले. 'सात हिंदुस्तानी'पासून 'जंजीर'पर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.


إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.