⚡ ब्रेकिंग News

सावंत बंधू पुन्हा एकत्र! गैरसमज दूर, 'एकत्र होतो, आहोत आणि सदैव राहू'; पृथ्वीराज सावंतांची भावनिक पोस्ट, विरोधकांना टोला


 शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत आणि भाजप नेते प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यातील गैरसमज दूर; जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी फेसबुकवर फोटो पोस्ट करून दिली माहिती; 'रक्ताची नाती कोणत्याही राजकीय वावटळीपेक्षा खूप मोठी'; 'कुटुंबात दुरावा निर्माण करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर'; 'तात्पुरत्या वादळांनी सावंत कुटुंब कधीही डगमगणार नाही'

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू भाजप नेते प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यातील गैरसमज दूर झाले आहेत. हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. शिवाजीराव सावंत यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी फेसबुकवर फोटो पोस्ट करत याबाबतची ही माहिती दिली आहे. आमचं कुटुंब पुन्हा एकदा एकाच भक्कम चौकटीत एकत्र आल्याचं पृथ्वीराज सावंतांनी सांगितलं आहे. कुटुंबात दुरावा निर्माण करुन स्वतःचा राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना आज सडेतोड उत्तर मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सावंत परिवारातील अंतर्गत कलह समोर आला होता. त्यानंतर शिवाजी सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांनी जिल्हा परिषदेसाठी भाजपमधून उमेदवारी मिळवत विजय मिळवला होता. अखेर दोन्ही सावंत बंधू एकत्र आले आहेत. सावंत परिवाराचे सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारीचे तसेच पुणे जिल्ह्यात शिक्षणाचे मोठे जाळे आहे. शिवाजीराव सावंत हे माढा तालुक्यात राजकारण करतात. सावंत परिवाराला मानणारा मोठा वर्ग माढा तालुक्यात आहे. तसेच माढा तालुक्यात त्यांचा साखर कारखानाही आहे. कारखानदारी आणि शिक्षणाच्या माध्यमातून या सावंत कुटुंबाने मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार दिला आहे.

सावंत परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत आनंददायी आणि भावनिक आहे. आदरणीय काका, राज्याचे माजी आरोग्य मंत्री व आमदार प्रा. तानाजीराव सावंत साहेब आणि आमचे वडील, राज्याचे ज्येष्ठ नेते प्रा. शिवाजीराव सावंत सर यांच्यातील गैरसमज दूर झाले आहेत. आमचं कुटुंब पुन्हा एकदा एकाच भक्कम चौकटीत एकत्र आलं आहे. आम्ही एकत्र होतो, एकत्र आहोत आणि सदैव एकत्रच राहू असंही पृथ्वीराज सावंत यांनी सांगितलं. रक्ताची नाती कोणत्याही राजकीय वावटळीपेक्षा खूप मोठी असतात असंही ते म्हणालेत.

गेले काही दिवस सावंत कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. परंतु, कुटुंबाची नाळ आणि रक्ताची नाती कोणत्याही राजकीय वावटळीपेक्षा खूप मोठी असतात. आज काकांनी माझ्या आणि माझा भाऊ ऋतुराज याच्या खांद्यावर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा जो हात ठेवला, तो आम्हा दोघांसाठी एका मोठ्या जबाबदारीचा आणि कृतज्ञतेचा क्षण होता.

हे कुटुंब केवळ एक नाव नाही, तर शिक्षण आणि सहकार क्षेत्रात उभा केलेला मोठा डोलारा आहे. कुटुंबात दुरावा निर्माण करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना आज सडेतोड उत्तर मिळाले आहे. तात्पुरत्या वादळांनी सावंत कुटुंब कधीही डगमगणार नाही. आम्ही एकत्र होतो, एकत्र आहोत आणि सदैव एकत्रच राहू असे पृथ्वीराज सावंत यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सावंत परिवारातील अंतर्गत कलह समोर आला होता. शिवाजी सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे दोन्ही बंधूंमध्ये राजकीय मतभेद निर्माण झाले होते. आता हे मतभेद दूर झाले असून दोन्ही बंधू पुन्हा एकत्र आले आहेत.

सावंत परिवाराचे सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारीचे तसेच पुणे जिल्ह्यात शिक्षणाचे मोठे जाळे आहे. शिवाजीराव सावंत हे माढा तालुक्यात राजकारण करतात. सावंत परिवाराला मानणारा मोठा वर्ग माढा तालुक्यात आहे. कारखानदारी आणि शिक्षणाच्या माध्यमातून या सावंत कुटुंबाने मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार दिला आहे.

सावंत बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत आणि भाजप नेते प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यातील गैरसमज दूर झाले आहेत. पृथ्वीराज सावंत यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहून ही माहिती दिली. 'एकत्र होतो, एकत्र आहोत आणि सदैव एकत्रच राहू' असे त्यांनी म्हटले. 'रक्ताची नाती कोणत्याही राजकीय वावटळीपेक्षा खूप मोठी' असेही ते म्हणाले. 'कुटुंबात दुरावा निर्माण करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळाले' असेही त्यांनी सांगितले. या घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...