⚡ ब्रेकिंग News

आटपाडीत मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी प्रकल्पाला चोरट्यांचा फटका! ३ लाख १५ हजार रुपयांच्या कॉपर केबलची चोरी


 पळसखेल येथील सौर प्रकल्पातील घटना; अज्ञात चोरट्यांविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

आटपाडी, सांगली : आटपाडी तालुक्यातील पळसखेल येथे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी प्रकल्पासाठी ठेवण्यात आलेल्या कॉपर केबलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत एकूण ३ लाख १५ हजार रुपयांच्या केबलवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळसखेल येथील गट क्रमांक ६१६ ते ६१९ मध्ये मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या ठिकाणी ठेवण्यात आलेली डी.सी. कॉपर केबल आणि अर्थिंग कॉपर केबल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चोरीस गेलेल्या मालामध्ये ३ लाख रुपये किमतीची ४ एमएम स्क्वेअर डी.सी. कॉपर केबल, ७ किलोमीटर ७०० मीटर लांबीची, तसेच १५ हजार रुपये किमतीची ७० एमएम स्क्वेअर अर्थिंग कॉपर केबल, २० मीटर लांबीची, यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत ३ लाख १५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी विद्याधर शिवाजी पवार यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार माळी करीत आहेत. चोरीच्या या घटनेमुळे सौर प्रकल्पाच्या साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...