क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उघड झाल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार विक्रम काकडे यांनी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर जाहीर भाषणातून टीका केली आहे. उमेश पाटील यांच्याकडून विक्रम काकडे हे पैशांच्या जीवावर आमदार झाल्याची चर्चा होतं असल्याचा आरोप काकडेंनी केला आहे. पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा अद्याप जन्माला येणार असल्याचे काकडे यांनी म्हटलं आहे. पैसे घेऊन आमदार झाल्याची चर्चा सतत झाल्यास असत्य देखील सत्य वाटतं असं म्हणत अशी चर्चा बंद करण्याचं आवाहन विक्रम काकडेंनी केलं. एक सोलापूरहून पार्सल आलं आहे, उमेश पाटील नावाचं. त्या व्यक्तीने बोलून दाखवलं की पैसे देऊन आमदार झालो. उमेश पाटील माझ्या नादाला लागू नको असा इशारा काकडेंनी दिला.
दरम्यान, मावळ येथे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आयोजित पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात विक्रम काकडे यांच्याकडून उमेश पाटलांवर टीका करण्यात आली आहे. आपल्याबाबतची अशी चर्चा न थांबल्यास बघून घेण्याचा इशारा देखील काकडेंनी दिला आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून, पक्षातील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या कुटुंबासाठी नाही तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी मंत्रिपद घेतलं आहे. दादा आपल्या प्रत्येकाला मदत करत गेले. आता आपल्याला परतफेड करण्याची गरज आहे असे काकडे म्हणाले. सुनील शेळके यांच्या निवडणुकीत पाहिलं की एका आमदाराचा अर्ज भरण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर आले होते त्याची चर्चा देशात झाली होती असे काकडे म्हणाले. पार्थ पवार, जय पवार दुःखातून सावरून आपल्यासाठी काम करत आहे. दादांच्या निधनानंतर विधान परिषद निवडणुका झाल्या या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, त्या केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीवर या जागा बिनविरोध झाल्या आहेत असे काकडे म्हणाले.
काही लोकं म्हणाले की विक्रम काकडे पैशांच्या जीवावर निवडून आले. पवारांना त्यांनी पैसे दिले म्हणून त्यांना संधी मिळाली. या बाहेरच्या लोकांना सांगायचं आहे, त्यांना माझं आणि अजित पवारांचे संबंध माहिती नाहीत. पार्थ पवार माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत. मला वाईट वाटलं हे आपल्या पक्षातील लोक बोलले. एक सोलापूरहून पार्सल आलं आहे उमेश पाटील नावाचं. त्या व्यक्तीने बोलून दाखवलं की पैसे देऊन आमदार झालो. त्या उमेश पाटीलला सांगणं आहे, उमेश पाटील पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा अद्याप महाराष्ट्रात जन्माला आलेला नाही. असल्या गोष्टी बंद करा पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा अशी टीका काकडे यांनी केली.
मी असं बोलणारा व्यक्ती नाही परंतू, मोठ्या लोकांकडून सांगण्यात आलं की जर सतत असं कोणी बोलत राहिलं तर कालांतराने त्यालाच सत्य मानलं जातं. मी स्पष्टपणे सांगतोय उमेश पाटील माझ्या नादाला लागू नको असा इशारा काकडेंनी दिला. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. आमदार विक्रम काकडे आणि पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील वाद जाहीर भाषणातून समोर आला आहे. यामुळे पक्षातील एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला विक्रम काकडेंनी उमेश पाटलांवर टीका केली असता, दुसऱ्या बाजूला पक्षाने यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. आमदार विक्रम काकडे यांनी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर जाहीर भाषणातून टीका केली आहे. 'उमेश पाटील माझ्या नादाला लागू नका, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा' असा इशारा दिला. 'पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा अद्याप महाराष्ट्रात जन्माला आलेला नाही' असे ते म्हणाले. सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांसाठी मंत्रिपद घेतल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.


إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.