नाशिक : नाशिकमध्ये धार्मिक विधीच्या आडून महिलांचा लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास अधिक गहन होत चालला आहे. विशेष तपास पथकाने (SIT) अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची साखळी उलगडण्यास सुरुवात केली असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांमध्ये अशोक खरातने गेल्या चार वर्षांत सुमारे ७० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. सर्व व्यवहार रोख रकमेतून करण्यात आले होते.
सध्या अशोक खरातला न्यायालयाने ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली असून, SIT त्याची कसून चौकशी करत आहे. या चौकशीत खरातच्या बँक खात्यांची तीनवेळा तपासणी करण्यात आली. कोणताही अधिकृत हिशेब नसल्याचे स्पष्ट होत आहे. मोबाईलमधून जप्त केलेल्या डेटामध्ये महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.
पतसंस्थांमध्ये खरात 'नॉमिनी'
सबसे मोठा धक्का म्हणजे, कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्था आणि जगदंबा पतसंस्था यांच्यातील खात्यांमध्ये अशोक खरातचा नॉमिनी म्हणून उल्लेख आहे. समता पतसंस्थेच्या एका शाखेत एकूण ५७ खातेदारांच्या नावे १०० हून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. या प्रत्येक खात्यावर अशोक खरात हे नाव नॉमिनी म्हणून जोडलेले आहे. या खात्यांवर सुमारे ६० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती SIT कडे आहे.
या खात्यांपैकी आठ खाती खरात कुटुंबीयांची आहेत. विशेष म्हणजे, या खात्यांमध्ये ‘चाकणकर’ नावाचे खातेही समोर आले आहे. पोलिसांनी अशोक खरातला या खात्याबाबत विचारले असता, त्याने नावे सांगण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, तपासात ‘प्रतिभा चाकणकर’ आणि आणखी एक ‘चाकणकर’ अशी दोन नावे समोर आली आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचे नावही प्रतिभा आहे, यामुळे तपासाला नवा वळण मिळाले आहे.
या सर्व खात्यांशी अशोक खरातचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. याचा अर्थ खरात या खात्यांवर पूर्ण नियंत्रण ठेवून व्यवहार करत होता.
शिर्डीत जमीन फसवणूक
अशोक खरात आणि त्याच्या पत्नी कल्पना खरातने शिर्डी परिसरात एका शेतकऱ्याची जमीन फसवणुकीच्या माध्यमातून ताब्यात घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणात कल्पना खरात, मुलगा हर्षवर्धन आणि कल्पनाचे दोन भाऊ यांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. SIT ने हर्षवर्धन आणि कल्पनाच्या भावांची पुन्हा चौकशी केली आहे.
शिवनिका संस्थानची चौकशी
अशोक खरातने ईशान्येश्वर महादेव मंदिराच्या नावाने चालवलेल्या ‘शिवनिका संस्थान’च्या तीन संचालकांचीही SIT ने समक्ष चौकशी केली. या संस्थानमध्ये खरातचे आर्थिक संबंध असल्याचे पुरावे आहेत. भक्तांना देवाच्या पूजा-विधीच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप आहेत. SIT आता या संस्थानच्या संचालकांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करत आहे.
तीन जिल्ह्यांमध्ये ७० कोटींची मालमत्ता
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केली आहे. सर्व व्यवहार रोख रकमेतून करण्यात आले. यामध्ये शेतजमीन, ग्लास हाऊस, मंदिर ट्रस्ट आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतर व्यक्तींची नावे वापरण्यात आली आहेत.
SIT ची चौकशी वेगाने
सध्या SIT पथक खरात कुटुंब, नातेवाईक, पतसंस्था, शिवनिका संस्थान आणि आर्थिक भागीदारांच्या चौकशीत व्यस्त आहे.
मुलगा हर्षवर्धन यांची पुन्हा चौकशी
कल्पना खरातच्या भावांची चौकशी
शिवनिका संस्थानच्या तीन संचालकांची चौकशी
पतसंस्थेतील १००+ खात्यांचा तपास
शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरण
अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर महिलांच्या लैंगिक शोषण, जबरदस्ती गर्भपात, अंधश्रद्धा, फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्यांचे अनेक आरोप आहेत.
नाशिक पोलिस आयुक्तालयाने या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतले असून, SIT च्या तपासाला पूर्ण वेग देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्पना खरात अद्याप फरार असून, तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. तिच्या माहेरी SIT ने धाड घालून चौकशी केली असता, “१६ वर्षांपासून संपर्क नाही” अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
अशोक खरात प्रकरण फक्त एका भोंदूबाबाच्या गुन्ह्यापुरते मर्यादित नसून, त्यात आर्थिक फसवणूक, जमीन घोटाळा, पतसंस्थांचा दुरुपयोग आणि महिलांचा शोषण यांचा मोठा जाळा समोर येत आहे. SIT च्या तपासात आणखी काय उघडकीस येतं, याकडे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाने नाशिकमध्ये खळबळ उडवली असून, भोंदूबाबांच्या जाळ्यात सापडलेल्या सामान्य लोकांना आणि महिलांना न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे. SIT च्या तपासात पतसंस्था, मंदिर ट्रस्ट आणि बेनामी मालमत्तांचा पूर्ण जाळा उघड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.