प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी आक्रोश मोर्चात हजारोंचा सहभाग; कांदा व मका दरासह विविध मागण्यांसाठी अधिकाऱ्यांशी फोनवरुनही चर्चा.
येवला (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाने नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जोरदार हजेरी लावली. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी येवला प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत आक्रमक आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी कडू यांनी प्रांताधिकारी कार्यालयावरच कांदे फेकून मारले.
कांदे फेकून निदर्शने :
प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात नारेबाजी केली. कांद्याला योग्य भाव न मिळाल्याच्या निषेधार्थ बच्चू कडू यांनी प्रथम कार्यालयावर कांदे फेकले. त्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात कांदे फेकून आपला रोष दर्शविला.
रस्त्यावरच भरवल्या पंगती :
आंदोलनादरम्यान प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारातच शेतकऱ्यांनी जेवणाच्या पंगती भरवल्या. शेतकरी बांधवांसाठी आणलेल्या खिचडीवर आंदोलकांनी ताव मारला. या अनोख्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आपली एकजूट दाखवून दिली.
अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा :
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह विविध अधिकाऱ्यांशी फोनवरून जोरदार चर्चा केली. देवरगाव येथील वीज प्रश्नावरून ते विशेष संतापलेले दिसून आले. तसेच, प्रांताधिकाऱ्यांशीही कांदा व मका दरावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
शेतकऱांच्या मागण्या काय?
या मोर्चातर्फे प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या:
कांद्याला व मक्याला योग्य भाव मिळावा.
भावांतर योजना तातडीने लागू करावी.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी.
पुढील आंदोलनाचा इशारा :
बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, मागण्या मान्य न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयावर आंदोलक मुक्कामी ठिय्या मांडणार आहेत. येवल्यातील या आंदोलनानंतर पुढील काळातही शेतकऱ्यांचा आक्रोश कायम राहण्याची शक्यता आहे.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.