⚡ ब्रेकिंग News

'दर पंधरा दिवसांनी नाशिकला जाऊन खरातला पप्पा, शुगर डॅडी म्हणायच्या'; राजीनामा देतानाच्या हसऱ्या फोटोवरही निशाणा.

 'दर पंधरा दिवसांनी नाशिकला जाऊन खरातला पप्पा, शुगर डॅडी म्हणायच्या'; राजीनामा देतानाच्या हसऱ्या फोटोवरही निशाणा.

'रुपाली चाकणकर दर १५ दिवसांनी नाशिकला जायच्या, अशोक खरातला पप्पा, शुगर डॅडी...'; रुपाली ठोंबरेंची घणाघाती टीका

मुंबई : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाने गंभीर आणि व्यापक स्वरूप धारण केले असून, त्याचे पडसाद थेट राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात खरातशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'दर पंधरा दिवसांनी नाशिकला जात होत्या'

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, "विकृत कृत्य करणाऱ्या बाईचा गुरु हा भोंदू बाबा आहे आणि दर पंधरा दिवसांनी त्या नाशिकला जात होत्या. दर पंधरा दिवसांनी त्यांना पप्पा म्हणत होत्या, डॅडी म्हणत होत्या, शुगर डॅडी म्हणत होत्या, याबाबत मला माहिती नाही."

त्यांनी पुढे टीका करताना म्हटले, "कुठल्या बाईने कुठे फिरावे? कोणाशी बोलावे? याचे वैयक्तिक स्वातंत्र्य असले तरी देखील संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने वागणे गरजेचे असते."

'अगं बाई तू वेडी आहेस का?'

रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा देतानाच्या फोटोवरही टीका केली. त्या म्हणाल्या, "त्यांना जनाची नाही तर बाई म्हणून मनाची देखील लाज नाही, हे कालच्या राजीनामा देतानाच्या फोटोवरून दिसून आले. हसत आहेत, कुठलं वैयक्तिक कारण होतं? अगं वेडी आहेस का बाई तू? मनोरुग्ण आहेस का? कुठला नरेटीव्ह सेट करत आहेस? कुठले वैयक्तिक कारण?"

'त्या भोंदूबाबाचे पाय तुझ्या नवऱ्याला लाव'

ठोंबरे यांनी आणखी एक टोला लगावताना म्हटले, "त्या भोंदूबाबाचे पाय तुझ्या नवऱ्याला लाव. आम्हाला काही देणंघेणं नाही. परंतु, महत्त्वाच्या पदावर बसून जो बालिशपणा चाललेला आहे तो हा महाराष्ट्र सहन करणार नाही."

प्रकरणाची पार्श्वभूमी

अशोक खरात याच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. विरोधकांच्या तीव्र दबावानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा पत्रात त्यांनी 'वैयक्तिक कारणे' दिली होती, मात्र ठोंबरे यांनी त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा

रुपाली पाटील ठोंबरे यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महिला आयोगासारख्या संविधानिक पदावर असताना चाकणकर यांच्या वागण्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशोक खरात प्रकरणातील तपास पुढे जात असताना, या वादामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्याकडून अद्याप या टीकेवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...