⚡ ब्रेकिंग News

१ एप्रिलपासून बदलणार आर्थिक नियम! पॅन कार्डपासून एटीएमपर्यंत, थेट वाजणार खिशाला चपराक

१ एप्रिलपासून बदलणार आर्थिक नियम! पॅन कार्डपासून एटीएमपर्यंत, थेट वाजणार खिशाला चपराक

 नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच पॅन कार्ड, एचआरए, क्रेडिट कार्ड, एटीएम व्यवहारांसह आयटीआर भरण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल लागू होणार आहेत. याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर आणि बचतीवरही होणार आहे.

१ एप्रिल २०२६ पासून देशभरात अनेक आर्थिक नियमांमध्ये मोठे बदल लागू होत आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आणि दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार आहे. नोकरदार वर्ग, करदाते आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी हे बदल विशेषतः महत्त्वाचे ठरणार आहेत. पॅन कार्ड, घरभाडे भत्ता (एचआरए), क्रेडिट कार्ड, एटीएम व्यवहार तसेच आयकर भरण्याशी संबंधित नियमांमध्ये या सुधारणा करण्यात आल्या आहेत. चला, जाणून घेऊया हे सर्व नियम सविस्तर...

पॅन कार्डसाठी आता अधिक कागदपत्रे आवश्यक

१ एप्रिलपासून पॅन कार्ड मिळवण्यासाठीचे नियम कठोर होणार आहेत. आतापर्यंत केवळ आधार कार्डच्या आधारे पॅन कार्डसाठी अर्ज करता येत होता, मात्र आता आधारबरोबरच जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, दहावीचे प्रमाणपत्र किंवा इतर वैध सरकारी कागदपत्रांपैकी एक आवश्यक असेल. या निर्णयामुळे पॅन कार्ड अधिक सुरक्षित होणार असले, तरी पॅन कार्ड मिळवण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. तसेच, पॅन कार्डसाठी नवीन फॉर्म सादर करावा लागणार आहे.

घरभाडे भत्ता (एचआरए) दाव्यासाठी कठोर नियम

घरभाडे भत्ता (एचआरए) दावा करणाऱ्यांसाठीही नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. जर एखादा कर्मचारी वार्षिक १ लाख रुपयांपेक्षा अधिक भाडे देत असेल, तर त्याला घरमालकाचा पॅन क्रमांक देणे बंधनकारक असेल. तसेच, घरमालक हा कुटुंबातील सदस्य आहे की नाही, याची माहितीही द्यावी लागणार आहे. १ एप्रिलपासून यासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक असेल. खोटे किंवा फसवे दावे रोखणे हा या नव्या नियमामागील उद्देश आहे.

एटीएम आणि रोख व्यवहारांचे नियम बदलले

बँकांनीही एटीएम आणि रोख व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

एचडीएफसी बँकने मेट्रो शहरांमध्ये मोफत व्यवहारांची संख्या तीन तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाचपर्यंत मर्यादित केली आहे.

पंजाब नॅशनल बँकने काही डेबिट कार्डधारकांसाठी दैनंदिन रोख काढण्याची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५० हजार रुपये केली आहे.

बंधन बँकने दरमहा केवळ पाच मोफत आर्थिक व्यवहारांनाच परवानगी दिली आहे. यापेक्षा अधिक व्यवहार केल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

आयटीआर भरण्याच्या तारखांमध्ये बदल

आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरणाऱ्यांसाठीही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नॉन-ऑडिट प्रकरणांसाठी आयटीआर-३ आणि आयटीआर-४ भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. तर आयटीआर-१ आणि आयटीआर-२ भरणाऱ्या अर्जदारांना ३१ जुलै पर्यंत विवरणपत्र दाखल करता येईल. या बदलांमुळे करदात्यांनी आपल्या नियोजनात आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...