⚡ ब्रेकिंग News

रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर पुन्हा निशाणा; जय पवारांवरही दबाव असल्याचा आरोप

 

 रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर पुन्हा निशाणा; जय पवारांवरही दबाव असल्याचा आरो

 बारामती विमान अपघात प्रकरणी राहुल गांधींची भेट; सीबीआय चौकशीची मागणी, डीजीसीए समिती राहुल गांधींच्या नेतृत्वात असावी

नवी दिल्ली: बारामती विमान दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला असून, जय पवार यांच्यावरही दबाव असल्याचे सूचित केले आहे.

राहुल गांधींकडे निष्पक्ष तपासाची मागणी

रोहित पवार यांनी राहुल गांधींच्या भेटीत बारामती विमान दुर्घटना, त्याचा तपास, पोलीस प्रशासन आणि सरकारची भूमिका याबाबत चर्चा केली. याप्रकरणी डीजीसीएच्या कलम १२ अंतर्गत समिती स्थापन करून ती राहुल गांधींच्या नेतृत्वात असावी, अशी मागणी त्यांनी केली. राहुल गांधी यांनीही याप्रकरणी निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी केली आहे.

सीबीआय चौकशीचा मुद्दा

रोहित पवार म्हणाले, "अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी महाराष्ट्र सरकारने अद्याप सीबीआयकडे प्रस्ताव पाठवलेला नाही. अजित दादांच्या पक्षाच्या प्रमुखांनी विनंती केली असून मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्रही देण्यात आले आहे, परंतु राज्य सरकारने प्रस्ताव सीबीआयकडे दिलेला नाही. सुशांत सिंह प्रकरणात बिहारने प्रस्ताव दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीबीआयने तपास सुरू केला होता."

ते पुढे म्हणाले, "मी सीबीआय, डीजीसीए आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे वेळ मागितली आहे. पण मी विरोधी पक्षातील आमदार असल्याने कदाचित वेळ मिळत नसेल. महाराष्ट्रात एफआयआरही होत नाही, इथे डीजीसीए भेटत नाही. डीजीसीए आणि सीबीआय हे केंद्राचे विषय आहेत."

प्रफुल्ल पटेल लक्ष्य, जय पवारांवर दबाव

रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "प्रफुल्ल पटेल स्वतः म्हणाले की अजित पवारांकडे शेवटची जी फाईल होती ती फाईल माझी होती. जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नये असे सांगण्यात आले आहे. कुणी सांगितले हे स्पष्ट नाही, पण जय पवार यांच्यावरही दबाव आहे."

पुढे बोलताना ते म्हणाले, "व्ही. के. सिंग यांच्या मुलाच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. सामान्य लोकांना हा विश्वासघात वाटतो. दादांबरोबर राहिलेला नेता लग्नाला उपस्थित होता, त्यांनीही विश्वासघात केला आहे. सिंग यांना वाचवले नाही तर ते आपले नाव सांगतील अशी भीती काही जणांना असू शकेल."

राहुल गांधींची प्रतिक्रिया

राहुल गांधी यांनी या भेटीनंतर ट्वीट करत म्हटले, "आमदार रोहित पवार यांनी आज माझी भेट घेत बारामती विमान अपघात आणि अजित पवार यांच्या निधनाच्या चौकशीबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे पत्र दिले. याप्रकरणात कायद्याच्या मूलभूत तत्त्वांचे पालन झालेले दिसत नाही. विशेष म्हणजे ही गंभीर घटना असतानाही अद्याप कुठलाही एफआयआर नोंदवण्यात आला नाही. या घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे." त्यांनी रोहित पवार यांच्या भेटीचा फोटोही शेअर केला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...